सेनगाव शहरातील मतदारांचा संमिश्र कौल ;कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

सेनगाव शहरातील मतदारांचा संमिश्र कौल ;कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

 महाराष्ट्र 24 न्यूज 
19/01/2022


शहरातील अतिशय प्रतिष्ठेची व अटीतटीची झालेली नगरपंचायत निवडणूक ही 17 प्रभागासाठी पार पडली असून आज 17 प्रभागातील मतमोजणी 6 टेबलावर 3 फेऱ्यात पूर्ण झाली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे5, शिवसेनेचे 5 व भारतीय काँग्रेस पार्टीचे 2असे विजयी उमेदवार झाल्याने कोणत्याच राजकीय पक्षाला नगरपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मतदारांनी नाकारले असून सर्वच पक्षाला संमिश्र असा कोल मतदारांनी दिला आहे.सेनगाव नगरपंचायत निवडणूक ही 17 जागेसाठी पार पडले असून सदर निवडणूक ही 13 प्रभागासाठी 21डिसेंबर रोजी पार पडली तर उर्वरित चार प्रभाग ओबीसी राखीव असल्याने ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्दबादल ठरून त्या जागेवर सर्वसाधारण प्रवर्ग 4 प्रभाग ठेवून त्यांची निवडणूक ही दिनांक 18 डिसेंबर रोजी पार पडली असून या पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज 19 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात 6 टेबलवर 3 फेऱ्या मध्ये पार पडली असून त्यामध्ये पुढील प्रमाणे प्रथम राजकीय पक्षीय विजयी उमेदवार व द्वितीय स्थानी असलेल्या उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार गायत्री गजानन देशमुख यांना 147 मतदान घेऊन विजय झाल्या तर दुय्यम स्थानी शिवसेनेच्या योगिता रामगोपाल सोमानी यांना 127 मध्ये मते पडली तर प्रभाग क्रमांक 2 मधून शिवसेनेच्या यमुनाबाई नारायण देशमुख यांना 201 मध्ये घेऊन विजयी झाल्या तर दुय्यम स्थानी भारतीय जनता पार्टीच्या अनिता संतोष खाडे यांना 143 मतावरच समाधान मानावे लागले तर प्रभाग क्रमांक 3 मधून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमोल प्रल्हाद तिडके यांना 217 मध्ये घेऊन विजय संपादित केला तर द्वितीय स्थानी शिवसेनेच्या रेखाबाई रावसाहेब देशमुख यांना 194 मतदानाचा टप्पा पार करता आला प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवार अंजलीताई अप्पासाहेब देशमुख यांना 127 मध्ये घेऊन विजयी झाल्या तर दुतीय क्रमांकामध्ये शिवसेनेच्या कविता जगन्नाथ देशमुख यांना 102 मतं पडली प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार मनीषा कैलास देशमुख यांना 189 घेऊन त्या विजयी झाल्या तर दुय्यम स्थानी भाजपाच्या राजकन्या दिनकरराव देशमुख यांना 156 मताचे मताधिक्य घेता आले तर प्रभाग क्रमांक 6 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार शालिनी देविदास देशमुख यांना 162 मते घेऊन त्या विजयी झाल्या तर दुसऱ्या क्रमांकाची मध्ये शिवसेनेच्या वनिता प्रशांत महाजन यांनी 120 महत्त्वाचा टप्पा घातला तर प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टीच्या विजय झालेल्या राधा श्रीराम देशमुख या 129 मताची आघाडी घेत विजय संपादित केला तर दुय्यम स्थानी काँग्रेसच्या तारामती प्रकाश देशमुख यांना 75 मते घेता आली प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेचे विजयी उमेदवार शिलानंद नामदेव वाकळे यांना सर्वाधिक मते 239 पडली असून ते विजय प्राप्त ठरले आहे तर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाचे संतोष दशरथ मुडे यांना 47 मते घेण्यात ते यशस्वी ठरले प्रभाग क्रमांक 9 चे विजयी उमेदवार ज्योती जगदीशराव देशमुख यांना 269 मताची आघाडी प्राप्त होऊन त्या विजयी ठरल्या तर दुय्यम स्थानी भारतीय जनता पार्टीचे गोविंद सखाराम इटकरे यांना 95 मते प्राप्त झाली प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेसच्या विजयी उमेदवार विमलबाई गंगाधर गाढवे यांना 138 मते प्राप्त झाले असून त्या विजय ठरले आहेत तर दुय्यम स्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास गंगाधर देशमुख यांना 122 मतावर थांबावे लागले. प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेच्या विजयी उमेदवार शिलाबाई गोविंद कोकाटे यांना 145 मते प्राप्त झाली तर दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गजानन विठ्ठलराव घोगरे यांना 62 मते मिळाली प्रभाग क्रमांक 12 च्या भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवार मीरा सतीश खाडे यांना 175 मते मिळाली असून त्या विजयी ठरले आहे तर दुय्यम स्थानी काँग्रेसच्या मीनाक्षी समाधान शिंदे यांना 61 मते मिळाली आहे तर प्रभाग क्रमांक 13 च्या विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून उषा गजानन मानकर यांना 157 मते प्राप्त झाली तर द्वितीय स्थानी शिवसेनेच्या वनिता पंजाबराव हनवते यांना 89 मते मिळाली प्रभाग क्रमांक 14 मधून भारतीय काँग्रेसचे विजयी उमेदवार ओमप्रकाश प्रल्हादराव देशमुख यांना 163 मते प्राप्त झाले असून ते विजयी ठरले आहेत तर दुय्यम क्रमांकाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश विठ्ठलराव देशमुख यांना 132 मते घेण्यात यशस्वी ठरले प्रभाग क्रमांक 15 च्या भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवार प्रयागबाई ज्ञानबा फटांगळे यांना 253 मते प्राप्त झाली असून त्या विजय ठरले आहे तर दुय्यम क्रमांकाची मते भारतीय काँग्रेसचे उमेदवार प्रभूआप्पा विश्वनाथ जिरवणकर यांना 182 मते प्राप्त झाली आहे तर प्रभाग क्रमांक 16 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार स्वाती संदीप बहिरे यांना 105 मताधिक्‍य प्राप्त झाली असून ते विजय झाले आहे दुसऱ्या क्रमांकाची मते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार शांताबाई बालाजी वानरे यांना 73 मते मिळाली तर प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे विजयी उमेदवार निखिल भाऊराव देशमुख यांना 195 मते घेऊन ते विजय झाले तर दुय्यम स्थानी भारतीय जनता पार्टीचे गोपाळराव शंकरराव देशमुख यांना 159 मते मिळविता आली आशा एकूण 17 प्रभागाची निवडणूक मतमोजणी पार पडली असून शहरातील मतदारांनी स्पष्ट बहुमत देण्यास नकार दिला असल्याचे स्पष्ट जाणवत आहे शहरातील मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना संमिश्र कॉल देण्यात धन्यता मानली असल्याचे पहावयास मिळत असून भारतीय जनता पार्टीचे 5विजयी उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 5 विजयी उमेदवार व शिवसेनेचे 5 उमेदवार विजयी झाले भारतीय काँग्रेसचे 2 उमेदवार विजय ठरले आहेत नगरपंचायत वर स्पष्ट बहुमतासाठी कुठल्याच पक्षाकडे बहुमत नसल्याने दोन पक्ष एकत्र येऊन राजकीय सत्ता स्थापन करण्या शिवाय पर्याय नाही तर सत्तास्थापनेसाठी सेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त होऊन नगरपंचायत वर सत्ता स्थापन करणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून आहे या मतमोजणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी सेनगाव तहसीलदार जीवककुमार कांबळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण ऋषी बंदोबस्त कामी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस निरीक्षक रजीत भोईटे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिक्षा लोकडे पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, अच्युत मूपडे सेनगाव बीट जमादार चव्हाण, महादु शिंदे, रमेश कोरडे, मेनकुदळे यासह दंगाकाबू पथक व सेनगाव पोलिसांनी मतमोजणी दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतमोजणी दरम्यान अतिशय शिस्त व शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली शहरात मतमोजणी दरम्यान कुठेही अनुसूचित प्रकार घडला नाही याकामी सेनगाव पोलीस निरीक्षक रजीत भोईटे यांनी विशेष पुढाकार घेऊन आपली पोलिस यंत्रणा कामाला लावून निवडणूक प्रक्रिया व निवडणूक मतमोजणी अतिशय शांततेत पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने