*सोयाबीन चोरणारे आरोपी, स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात*
महाराष्ट्र 24न्यूज
*पाच क्विंटल सोयाबीन, तिन क्विटल हरबरा व गुन्हयात वापरलेले मोटार सायकल असा एकूण 1,06,000/- रू चा मुददेमाल जप्त*
हिंगोली जिल्हयातील घरफोडी व चोरीविरूध्द दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली पथकास दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली पथकाने गोपनिय माहिती काढुन आरोपी नामे 1) संजय उर्फ काल्या पंडीत काळे, वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी व 2) सुनिल बाबाराव काळे, वय 24 वर्ष व्य मजुरी, दोन्ही रा लिंबाळा मक्ता, ता जि.हिंगोली यांना संशयावरून ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी (1) पो.स्टे. हिंगोली ग्रामीण गुरन 264/ 2021 कलम 451, 380 भादवी. (2) पो.स्टे. हिंगोली ग्रामीण गुरन् 107/2021 कलम 457. भादवी (3) पो.स्टे नर्सी ना. गुरनं 13/2021 कलम 380 मादंदी. हे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने, पुढील तपास करून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला पाच क्विंटल सोयाबीन, तिन क्विटल हरबरा व गुन्हयात वापरलेले मोटार सायकल असा एकूण 1,06,000/- रू चा मुददेमाल जप्त करून, दोन आरोपी जन मुद्देमाल संधीत पो.स्टे ला पुढील तपासकामी हजर केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख . पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे. एएसआय बालाजी बोके, पोलीस अंमलदार शंकर जाधव, नितीन गोरे, किशोर कातकडे वसंत चव्हाण, विशाल घोळदे, विठठल काळे, आकाश टापरे ज्ञानेश्वर सावळे सुमित टाले. शेख जावेद यांच्या पथकाने केली
टिप्पणी पोस्ट करा