“ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग वाशिम यांच्या अंतर्गत वाशिम हिंगोली वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे चौपदरीकरणाचे वाशिम विभागातर्फे करण्यात येत आहे. सदर महामार्ग हिंगोली शहराच्या बाजूने बाह्य वळण रस्त्याद्वारे जात आहे. सद्यपरिस्थतीत सदरील बाह्य वळण रस्त्यामध्ये महापारेषण 132 के व्ही हिंगोली सर्किट 1 आणि 2 ही वाहिनीचे मनोरा क्र.129ते 136 हे रोडच्या मध्यभागी येत असल्यामुळे 220 केव्ही उपकेंद्र लिंबाळा हिंगोली ते 132 के व्ही हिंगोली उपकेंद्र दरम्यानचे वाहिनीवर काम करावयाचे आहे.
सदरील 132 के व्ही हिंगोली उपकेंद्राव्दारे हिंगोली शहर व ग्रामीण परिसर,कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण परिसर, सेनगाव तालुक्यातील काही भागात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यात येतो. सदरील 132 केव्ही हिंगोली सर्किट 1 & 2 या वाहिनीचे स्थलांतरित व मार्ग बदलण्याची काम जवळपास पूर्ण झाले असून त्यापैकी मौजा सावरखेडा ता हिंगोली येथे एक मनोरा लाईनच्या खाली उभारण्याचे व तारा ओढण्याची काम बाकी आहे. सदर काम महापारेषण नांदेड विभागातर्फे करण्यात येत असुन त्याकरता सदर वाहिनी बंद करणे आवश्यक आहे.
तरी *132 के व्ही हिंगोली सर्किट एक आणि दोन हे दिनांक 3-02-2022 रोजी सकाळी 6:000 ते सायंकाळी 18:00 वाजे पर्यंत बंद करण्याचे नियोजित आहे*. सदरील कामासाठी हिंगोली शहरातील अशंत: तसेच हिंगोली ग्रामीण मधील आडगाव, पांगरी, बासंबा, पेडगाव, खडकद, खानापुर, समगा 33 केव्ही उपकेंद्र परिसरातील आणि कळमनुरी तालुक्यातील मसोड 33 केव्ही उपकेंद्र परिसरातील आणि सेनगाव तालुक्यातील कडोळी 33 केव्ही उपकेंद्र भागातील, 33 केव्ही नर्सी नामदेव उपकेंद्रातील शेती पंपाचा विज पुरवठा बंद राहील. करीता सदर परिसरातील जनतेने नोंद घ्यावी व महावितरण प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती. “
टिप्पणी पोस्ट करा