देसी कट्ट्या सह एकाला कुरुंदा पोलिसांनी पकडले
महाराष्ट्र 24 न्यूज
2 फेब्रुवारी 2022
कुरुंदा पोलिसांनी एकाला देसी कट्ट्या सह रंगेहात पकडले
सविस्तर माहिती अशी की
श्री.राकेश कलासागर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली,मा. श्री. यशवंत काळे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.कांबळे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनि अशोक गोपीनवार
,ASI वाळके,HC /394 HC/365,NPC/718 NPC /735,PC/238,PC/243, PC/877 असे आम्हास गोपनीय माहितगार मार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा देशी कट्टा व सोबत काडतूस असे एका मोटर सायकल वर घेवून वाई फाटा येथे येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही वरील सर्व टीमसह सदर ठिकाणी सापळा रचून संशयीत मोटरसायकल वरून येणा-या ईसमास शिताफीने थांबून त्याच्याजवळ पंचा समक्ष चौकशी केली असता इसम नामे रमाशंकर ओमप्रकाश कशब रा उत्तर प्रदेश वयं २८ त्याच्या जवळ एक गावठी कट्टा किंमती 20,000/रू व जीवंत काडतूस किं5000/रु,मोबाईल किं 10,000/रू व मोटरसायकल क्र UP 27 K 3234 किं 40,000/ रू असा एकूण 75000 रू मुद्देमाल मिळून आला आहे त्यास पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे
अशी माहिती कुरूंदा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि अशोक गोपीनवार
यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना दिली
टिप्पणी पोस्ट करा