खाकी वर्दीतच दडली मायेची ऊब शंकर जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
महाराष्ट्र 24 न्यूज
2 फेब्रुवारी 2022
हिंगोली
पोलिस दलातील शंकर दत्तराव जाधव एका शेतकऱ्याचा मुलगा पोलीस दलामध्ये 29 वर्षे सेवा करत आत्तापर्यंत 300 पोलीस रीवाड हासिल करत अनेक गोरगरिबांना तेरा वर्षापासून मदतीचा ओघ सुरूच असतो
सेनगाव तालुक्यातील एका महिलेला दाताचा आजार होता
त्या महिलेला थेट दवाखान्यात नेऊन उपचार केला नवीन दात बसून सुद्धा दिल्याने
त्या महिलेने साहेब तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहेत
असे उदगार काढत त्या महिलेने
हंबरडा फोडला
या महिलेवर दाता साठी उपचार केला
दरम्यान काल
रात्रीला पेट्रोलींग करत असताना एक जोडपे थंडीच्या लाटेत कुडकुडत असल्याचे पाहताच त्यांच्या मनात येऊन मायेची ऊब निर्माण झाली असुन त्यांनी चक्क त्यांच दिवशी २५ गरीब व गरंजवतांना ब्लँकेटचे वाटप करुन मायेची ऊब दिली आहे.
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर जाधव यांनी
जिल्ह्यातील क्राईम सुधा कमी केल्याचे कारवाईतून दिसून येत आहे
त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठ सुद्धा थोपटली आहे
जिल्ह्यात अनेक दिवसापासुन गारवा निर्माण झाला असुन थंडयागार गारव्यामुळे नागरिकांचे हाल बेहाल होत आहेत. तसेच या थंडीमुळे कोविड रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. एकिकडे आलीशान बंगल्यात राहणारे श्रीमंत लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी रूममध्ये हिटर लावतात तर काही जण हजारो रूपये किंमतीचे ब्लँकेट, स्वेटर वापरतात. मात्र झोपडीत राहणारे गोर गरीब, गरजु थंडीमध्ये कुडकुडत असतात. अशाच प्रकारे थंडीने हैराण असलेल्या वयस्कर नागरीकांवर एका पोलिस जमादाराची नजर पडली आणि त्यांच्या मनाला सदर गोष्ट लागली. मग काय चक्क पोलिस जमादार शंकर जाधव यांनी थेट एटीएमवर जाऊन पैसे काढले व त्यांनी आपल्या पगारीतुन एकुण २५ गरीब, गरजु वयस्कर महिला पुरूषांना थंडी पासुन बचावासाठी ब्लँकेट चे वाटप करून गरीबांना थंडीत मायेची ऊब दिली. सदर वयोवृद्ध नागरिकांनी पोलिस दादांचे आभार मानत अशिर्वाद दिले.
यापुढेही माझी गरिबासाठी सेवा सुरूच राहील असे
हिंगोली पोलीस दलातील
शंकर जाधव यांनी
महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा