नावाप्रमाणे यशाला गवसणी घालणारे श्री.यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक हिंगोली ....

नावाप्रमाणे यशाला गवसणी घालणारे श्री.यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक हिंगोली ....

वाढदिवस विशेष 

खाकी परीधान केलेला पोलीस हा रागीट कडक स्वभाव व कडक शिस्तीचा असा अनेकांचा समज आहे.मात्र या खाकीत माणुसकी जपणारे अनेक व्यक्तीमत्व दडलेले आहेत.अशाच व्यक्तीमत्वापैकी एक आहेत ते श्री.यशवंत काळे.

 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात श्री अशोक काळे सौ.सुरेखा काळे या दांपत्याच्या पोटी यशवंत काळे यांचा जन्म झाला घरची परिस्थिती सर्वसामान्य यशवंत काळे यांना लहानपणापासूनच शिक्षणाची रुची प्राप्त झाली होती.

 त्यांचे प्राथमिक शिक्षण भोसे या गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण पूर्ण होताच कोल्हापुरातील ॲग्रीकल्चर महाविद्यालयात त्यांनी बीएससीची पदवी संपादन केली. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी एमपीएससी चा मार्ग निवडला .लहानपणापासून  खाकीची आवड असलेल्या यशवंत काळे यांनी पोलिस होण्याचे स्वप्न सुरू प्रयत्न सुरू केले. दिवसरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे  घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा त्यांनी दिली व पहिल्याच प्रयत्नात त्यांचे 2010 साली पोलीस दलाचे स्वप्न साकार झाले... आई वडिलांचे आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले व प्रशासकीय सेवेतून सर्वसामान्य नागरिकांची सेवा करायला मिळावी याचा आनंद सार काही सांगून जात होता.....
यानंतर आपले पोलिस दलाचे प्रशिक्षण करून ते पहिले पोस्टिंग साठी अकोला येथे जाण्यास सज्ज झाले. प्रोबेशनरीच्या च्या काळात अकोला येथे  उल्लेखनीय कार्य बजावले.. यानंतर त्यांची पोस्टिंग गडचिरोली् येथे नक्षलवादी भागात करण्यात आली .गडचिरोलीत पदभार घेताच व नक्षलवादी भागात कर्तव्य असताना गुटखा वाळू वाहतूक अशा अनेक घटना त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून कायदा-सुव्यवस्था राखत  आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते उदयास येऊ लागले.. बेधडक पणे केलेल्या कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालक यांनी त्यांचा पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मान केला . त्याच सोबत त्यांनी पोलिस दलात उल्लेखनीय कार्य करत असताना पोलिस शौर्यपदक विशेष सेवा पदक व खडतर सेवा पदक असे सन्मान प्राप्त केले आहेत. गडचिरोली येथील यशस्वीरित्या कार्यकाल पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली सातारा जिल्ह्यातील दहिवडी विभागात पोलीस उपअधीक्षक करण्यात आली. यावेळी त्यांनी दहिवडी येथे पूर्ण गुन्हेगारी मुक्त करून टाकण्यात मोलाची भूमिका बजावली होती... सातार्‍यातला देखील कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांची पदोन्नती  हिंगोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी  झाली.. हिंगोली जिल्ह्यात कर्तव्यावर असताना आपल्या कौशल्यपूर्ण संवाद शैलीच्या  मदतीने काळे यांनी जनतेशी संवाद साधत आपलेपणाची भावना रुजवली परिणामी नागरिकांना पोलिसांप्रती भीती ऐवज  आदर निर्माण झाला
आपल्या कर्तव्यदक्ष,व सचोटीने काम करण्याच्या पद्धतीमुळे पोलीस खात्यातील लोकप्रिय अधिकारी म्हणून श्री.यशवंत काळे हे सर्वदूर परिचित आहेत..
कोरोनाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ते 
संयमाने  हाताळताना दिसले. गरीबांना न्याय कसा मिळेल, त्यांच्या अडचणी दूर कशा होतील यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. लॉकडाउनच्या काळात अडकलेल्या लोकांना घरी पोहचवण्याचे काम सुद्धा त्यांनी केले .
*साहेब आज ही आपला साधेपणा टिकवून आहेत* .

 सुट्टी काढुन गावी आले तरी तरुणांच्यात रमतात.. काय चाललय सध्या.. काय करतोयस.. काय शिक्षण घेतोयस.. पुस्तके लागली तर सांग..अभ्यासाचं काही वाटलं तर विचार अस ते आवर्जुन समोरच्याला विचारतात. पदावर कार्यरत आहे म्हणुन कोणता आविर्भाव नाही. अन त्याचा दिखावा ही नाही. आज ही ते सुट्टीला आले की साधा शर्ट पॅन्ट वापरतात. जेष्ठांच्या तब्बेतीची चौकशी करतात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांच काम ते करत राहतात. अन कित्येक तरुणांना त्यांच्या पंखात ते बळ देत राहतात. ...पोलिस खात्यात उच्च पदावर कार्यरत असलेल्या श्री.यशवंत काळे यांनी संघर्ष अन जिद्दीने ध्येय गाठले असले तरी त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले आहेत. पोलिस खात्यात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुणांना ते खऱ्या अर्थाने आज प्रेरणादायी ठरत आहेत ....

अशा या संवेदनशील पोलीस अधिकार्याला वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सर  ....👍🎉🎊🎂💐🇮🇳♥️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने