हिंगोलीत आंतरजातीय विवाहास प्रतिसाद मिळेनाकेवळ तीन वर्षात ३२ विवाह पार पडले



हिंगोलीत आंतरजातीय विवाहास प्रतिसाद मिळेना

केवळ तीन वर्षात ३२ विवाह पार पडले

हिंगोली-
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने  १८- २१ या तीन वर्षात केवळ ३२ आंतरजातीय विवाह पार पडले असून यातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या २४ जोडप्याना बारा लाख रुपयांचे वितरण केले आहे. मात्र जिल्ह्यात आंतरजातीय विवाहास प्रतिसाद मिळत नसल्याचे यावरून स्पस्ट दिसून येते.
अंतरजातीय विवाह करण्यासाठी केंद्र व राज्य शासनांकडून प्रयत्न चालविले असून त्याचा प्रसार व प्रचार केला जात आहे.राज्यातील जातीय भेदाभेद कमी करण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी अंतरजातीय विवाहित जोडप्याना अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व जमाती,व विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अश्यानी विवाह केल्यास तसेच मागास वर्गातील अनुसूचित जाती, जमाती ,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जोडप्याना या योजने अंतर्गत पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य समाज कल्याण विभागाकडून पती, पत्नीच्या नावे दिले जाते.


जिल्ह्यात  १८-१९यावर्षात ३२ आंतरजातीय विवाह पार पडले तर २०-२१ या वर्षात आठ प्रस्ताव मंजूर झाले असून यातील पाच प्रस्ताव प्रलंबित पडले आहेत. अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने  यातील मंजूर आठ जोडप्यांना निधीचे वाटप झाले नाही. पाच प्रस्तावात त्रुटी आढळून आल्याने त्रुटींची पूर्तता करताच त्यांना ही हा निधी वाटप केला जाणार आहे. मात्र आजघडीला आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना निधी अभावी ताटकळत राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात आंतरजातीय विवाह करण्यासाठी प्रसिद्धी केली जात नसल्याने आंतरजातीय विवाहासाठी अनेक जण पुढे येत नाहीत  त्यामुळे यासाठी समाजकल्याण विभागाकडून व्यापक  प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे.


योजनेसाठी प्रमुख अटी

---------------------

राज्यातील रहिवासी असावा, विवाहित जोडप्यापैकी एकजण हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी असावा, जातीचा दाखला आवश्यक, विवाहित जोडप्याचा विवाह नोंदणी दाखला असावा, लग्ना वेळी वराचे वय२१ तर मुलीचे वय १८वर्ष पूर्ण असावे, एकत्रित फोटो, प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्र, आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
अंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यानी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे अपेक्षित आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने