सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने महिला समितीची बैठक
महिला समितीच्या प्रमुख पदी ज्योतीताई कोथळकर यांची एकमताने निवड
हिंगोली (प्रतिनिधी)- सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने महिला समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिपोत्सव, रांगोळी, ऐतिहासिक वेशभुषा व संवाद स्पर्धा याचे नियोजन करण्यात आले. महिला समितीच्या प्रमुख पदी ज्योतीताई कोथळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
गुरुवार दि.३ फेब्रुवारी रोजी येथील एनटीसी भागातील छत्रपती शिवाजी राजे उद्यान परिसरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोली च्या वतीने महिलांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळयास अभिवादन करण्यात आले. यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. शिवजन्मोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही व्यापक व भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महिला समितीच्या प्रमुख पदी ज्योतिताई कोथळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत शिवजन्मोत्सव नियोजनावर उपस्थित महिलांच्या सुचना मागविण्यात आल्या. शिवजन्मोत्सवात यंदा महिलांचा सहभाग मोठया स्वरुपात राहण्यासाठी नियोजन करण्यात आले. दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता शिवजन्मोत्सवाच्या पुर्व संध्येला भव्य दिपोत्सव यासह शिवजयंती दरम्यान ऐतिहासिक वेशभुषा व संवाद स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला माजी नगराध्यक्षा अनिताताई सुर्यतळ, उमाताई तांडुरकर, मालतीताई कोरडे, छायाताई मगर, वंदनाताई आखरे, योगिताताई देशमुख, जगजितकौरताई अलग, कुंताताई लोखंडे, ज्योतीताई वाघमारे, अनिताताई शिंदे, बलवंतकौरताई अलग, कमलाताई यादव, मिराताई कोरडे यांच्यासह महिला भगिंनी मोठयासंख्येने उपस्थित होत्या. महिला समितीच्या प्रमुखपदी ज्योतिताई कोथळकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उपस्थित महिलांनी केला. महिला समिती सदस्यपदी इच्छुक महिलांनी शुक्रवार दि.४ फेब्रुवारी पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महिला समितीच्या प्रमुख ज्योतिताई कोथळकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा