सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल
हिंगोली (प्रतिनिधी)-
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शहरात प्रथमच हिंगोली केशरी किताब नावाने भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन होणार आहे. या कुस्त्यांच्या दंगलसाठी कै.रामेश्वरराव शिंदे यांच्या स्मृतीपित्यर्थ राजेश रामेश्वरराव शिंदे यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात येणार आहे. पं.स.सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष संतोष टेकाळे यांच्यावतीने प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये, संत नामदेव ऑप्टीकल्स आशिर्वाद नेत्र रुग्णालय संघटक प्रितम सरकटे यांच्यावतीने द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये, सय्यद शामद सय्यद फत्ररु यांच्यावतीने तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये, योगाजीराव मांडगे यांच्यावतीने चतुर्थ पारितोषिक ७ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच कै.शेषराव बांगर पहेलवान यांच्या स्मरणार्थ पंचम पारितोषिक ५ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. कुस्तीपटूनी व शिवप्रेमींनी या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवा निमित्त होणार्या केशरी किताब नावाने कुस्त्याच्या दंगलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. कुस्तीची दंगल यशस्वीतेसाठी संयोजक समितीचे ऍड.मनिष साकळे, भरत चौधरी, मनिष आखरे, बाबुराव कदम, फुलाजी सावळे, गणेश बांगर, संजय मांडगे, रामप्रसाद टेकाळे, राजेश शिंदे हे परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेला माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शेख निहाल भैय्या, श्रीराम बांगर, प्रसन्न बडेरा, सुनिल देवडा, गजेंद्र बियाणी, ज्ञानेश्वर मामडे, ज्ञानेश्वर जाधव, पंकज अग्रवाल, प्रकाश थोरात, ऍड.राजेश गोटे, सुभाष बांगर, सुमित चौधरी, इंजि.पी.आर.देशमुख, आकाश मुळे, उमेश गुठ्ठे, गोविंदराव भवर, सुशील मुंदडा, शैलेश जयस्वाल, माधव कोरडे यांनी सहकार्य केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा