कर्नाटक घटनेचा कळमनुरी तालुक्यात तीव्र निषेध
महिला रस्त्यावर उतरून राष्ट्रपतींना पाठवले निवेदन
कळमनुरी - महाविद्यालयीन मुलीला हिजाब वापरण्यास मनाई करून तिच्या मानवी अधिकाराचा घात करण्याची घटना कर्नाटकातील एका महाविद्यालयात घडली ही घटना राज्यघटनेचा अपमान करणारी असून भारतीयांना लज्जास्पद करणारी आहे या घटनेचा संपूर्ण भारतात निषेध केला जात असुन कळमनुरी तालुक्यातही महिलांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले.
निवेदनात नमूद केले आहे की, कर्नाटकातील मुस्लिम समाजाच्या महाविद्यालयीन मुलीला हिजाब घालून येण्यास मनाई करत महाविद्यालयात प्रवेश करण्यास नकार दिला एवढेच नव्हे तर काही देशद्रोही बंडखोरांनी अल्पशा आर्थिक लालच पोटी मानवी अधिकार विसरून एका विशिष्ट वस्त्रांचा परिधान करून घोषणाबाजी करून राज्यघटनेचा मर्डर करत त्या मुलीस रोखण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाची ओढ असलेल्या त्या मुलीने आपल्या स्वतःच्या हिमतीने दिलेरी दाखवत हजारो बंडखोरांना न जुमानता महाविद्यालयात प्रवेश केला ही घटना स्वतंत्र भारतासाठी लज्जास्पद असून भारतीय संविधान दृष्टीने हानिकारक आहे .या घटनेच्या सगळीकडे निषेध होत असून कळमनुरी तालुक्यात दहा फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
मुस्लिम समाजातील मुलीला हिजाब घालून प्रवेश करण्यास नकार दिला व तसेच काही देशद्रोही बंडखोरांनी त्या मुलीस महाविद्यालयात प्रवेश करताना विशिष्ट वस्त्रांचा परिधान करून घोषणाबाजी करत अडवण्याचा प्रयत्न केला अशा बंडखोरांना व त्यामागील संघटनांचा तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशा घटना राज्यघटनेला अपमानित करणारे आहेत यावर शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर हजारो मुस्लिम महिला मुली व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा