हिंगोली पालिकेच्या वतीने एक हजार मोहगनी वृक्षांची लागवड
हिंगोली : स्वर्गीय राजीव सातव नाट्यगृह परिसरातील जागेमध्ये नगरपरिषदेच्या वतीने एक हजार मोहगणी वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली.
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्व. खासदार राजीव सातव नाट्यगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. सदर जागेमध्ये पालिकेच्या वतीने एक हजार मोहगणी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
सदर वृक्षांचे लाकूड हे उच्च प्रतीचे फर्निचर तयार करण्यासाठी उपयोगात येते. दहा वर्षानंतर ही झाडे कटाईस येतात त्यावेळी एका झाडाचे मूल्य हे जवळपास ८० हजार रुपयांपेक्षा अधिक ठरते. या दृष्टिकोनातून ही लागवड करण्यात आली असून झाडांच्या संगोपना करिता ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाट्यगृहाच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे पाणी जलपुनर्भरण यंत्रणेद्वारे कूपनलिकेत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात झाडां करिता मुबलक पाणी उपलब्ध होईल असा विश्वास देखील नगरपालिकेने व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा