*महसूल विभागाची रेती चोरीविरुद्ध धडक कारवाई*
हिंगोली- शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटे पाच वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुक्यातील इंचा येथे एकाच वेळी रेती चोरी करणारे चार ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय हिंगोली येथे लावण्यात आले आहेत. संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी सांगितले आहे. महसूल विभागामार्फत रात्रीची गस्त घालून कारवाया करण्यात येत असल्यामुळे रेती चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरील कारवाई करणाऱ्या पथकामध्ये मंडळ अधिकारी सय्यद आयुब, गजानन पारीसकर, मनोहर खंदारे, अव्वल कारकून गणेश शिंदे, तलाठी देविदास इंगळे, भास्कर पांडे, विजय सोमटकर, रंजीत देशमुख, हर्षवर्धन गवई, बद्रीनारायण वाबळे, प्रदीप इंगोले, रवी इंगोले, विष्णू मस्के, अनिल निर्मले, वामन राठोड, माधव भालेराव, अशोक केंद्रेकर, नवनाथ वानोळे, नागेश कांबळे, चालक वाघमारे, सुनील मरळे हे होते.
टिप्पणी पोस्ट करा