दवाखान्यातून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

दवाखान्यातून पोलिसांना चकमा देणारा आरोपी अखेर  पोलिसांच्या जाळ्यात 

फेब्रुवारी १२, २०२२ 
महाराष्ट्र 24 न्यूज 

 
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपीस गोरेगाव पोलिस जिल्हा सरकारी दवाखान्यात कोरोना चाचणी करण्यासाठी नेत असताना दवाखान्यात गर्दीमध्ये पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या आरोपीस आवघ्या आठ दिवसात गोरेगाव च्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. कानरखेडा येथील रहिवासी आरोपी विजय भगत याच्या वर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 16/2022 कलम 354,452,294, ईतर भांदवी गुन्हेतील अटक आरोपीस न्यायालयीन कोठडीत नेण्यापुर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी दरम्यान रूग्णालयातुन फरार झाला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सदर आरोपीविरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यात आला होता. यानंतर फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, पोलिस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव च्या ठाणेदार श्रिदेवी पाटील यांनी पोलिसांची विविध पथके तयार करून शोधकामी रवाना करण्यात आली होती. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी, दिंडोरी, नाशिक जिल्हा पोलिसांनी पिंजुन काढला होता. सदर आरोपी नाशिक ग्रामीण हद्दीतील सिन्नर येथे मिळून आला असुन गोरेगाव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर तो आरोपी बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे.
गोरेगाव च्या ठाणेदार श्रिदेवी पाटील यांच्या पथकास आठ दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. पथकामध्ये पोलिस कर्मचारी राहुल गोटरे, काशीनाथ शिंदे, शिवाजी शिंदे, नवनाथ शिंदे, अमोल जाधव, महाले यांचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने