पहेनी येथील पाण्याचा बहाणा करून एका महिलेचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले

पहेनी  येथील पाण्याचा बहाणा करून एका महिलेचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले 

महाराष्ट्र24न्यूज 
 प्रतिनिधी शिवम कुबडे 
हिंगोली तालुक्यातील पहेनी येथे 12 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास 
पिण्याच्या पाण्याचा बहाणा करुन एका भामट्याने महिलेचे दागिने  लुटल्याचे  घटना घडली आहे 
सविस्तर माहिती अशी की
पहेणी  येथील सिंधुताई घोंगडे या दुपारी घरांमध्ये एकट्याच  होत्या  त्यावेळी एका भामट्याने येऊन पिण्यासाठी पाणी मागितले असा पाणी आणण्यासाठी घरात जातच घरात कोणी नसल्याचे पाहून भामट्याने घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून सिंधुताईच्या अंगावरील सोन्याची गळ्यातील एकदाणी 
हातातील चांदीचे कडे 
तसेच चोरट्याने चाकूचा 
दाखवत 80 ते 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची कबुली सिंधू घोंगडे यांनी दिली 
घटनेची माहिती मिळताच
गावातील नागरिक व
नरसी नामदेव येथील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले
दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात नाकाबंदी केली असून 
चोरट्यांचा लवकरच तपास करू असे  पोलिसांनी   सांगितले 
दिवसाढवळ्या पहेनी त  घरात बसून महिलेचे दागिने पळविल्याने 
गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने