*हिंगोली शहरात प्रथमच शिवजन्मोत्सवानिमित्त हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार*
हिंगोली-/प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने हिंगोली शहरात प्रथमच १९फेब्रुवारी रोजी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात येणार.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे, शिवजन्मोत्सवानिमित्त लगातार तीन दिवस कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.त्यात मुख्य आकर्षण म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ते१० पर्यंत प्रथमच हिंगोली शहरातील सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे हेलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून मानवंदना करण्यात येणार असून, त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,विश्वशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा,राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा,महावीर स्तंभ,महात्मा बसवेश्वर स्तंभ,जय महेश स्तंभ,प्रियदर्शन इंदिरा गांधी पुतळा,महाराजा अग्रसेन पुतळा येथे हेलिकॉप्टरद्वारे करून मानवंदना देण्यात येणार आहे.शहरामध्ये प्रथमच हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार त्यामुळे जिल्ह्यातील शिवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तरी सर्व शिवप्रेमींनी शिवजयंती महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा