देशी विदेशी दारू च्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेची कार्यवाही;25,000/-चा मुद्देमाल जप्त*

*देशी विदेशी दारू च्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेची कार्यवाही;25,000/-चा मुद्देमाल जप्त*

दिनांक 17 /3/ 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक होळी सणाच्या अनुषंगाने जिल्हा हद्दीत अवैध दारू विक्री विरुद्ध कार्यवाही करत असताना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीमधील जामगव्हाण या गावी सचिन लेकुळे हा इसम स्वतःच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारुचा साठा करून विक्री करीत आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक एस.एस. घेवारे यांच्या पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी पाच देशी दारूचे बॉक्स व आरधा विदेशी दारू चा बॉक्स मिळून आला. सदरचा दारू पार्सल करणारा बिलाल प्यारेवाले राहणार गारमाळ व किरकोळ मद्य विक्रीचा परवाना असताना ठोक मद्य विक्री करणारे दुकानदार नामे शैलेश जयस्वाल तसेच सदर दुकानातील मॅनेजर अण्णा व फिरोज राहणार खुशाल नगर तसेच दुकान मालक या सर्वां विरुद्ध पोलीस स्टेशन कळमनुरी येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 80, 81, 82, 83, 65 ई प्रमाणे पी एस आय घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच 25 हजार रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची ार्यवाही पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अमलदार विशाल घोळवे, ज्ञानेश्‍वर सावळे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे. 
अवैध दारू विरुद्ध कार्यवाहीची मोहीम सतत चालू राहणार असल्याचे सांगितले असून होळीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी दिनांक 18 /3/ 2022 रोजी दारू विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असून सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कार्यवाही करणार असल्याचे तसेच किरकोळ मद्य विक्री परवाना असताना ठोक मद्य विक्री केल्यास सुद्धा दुकान मालकाविरुद्ध  कार्यवाही करणार असल्याचे पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने