हिंगोली पाच लाखाचे गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
हिंगोली सायबर पोलीसांनी 35 गहाळ मोबाईलचा शोध घेवून गुळ मालकास केले सन 2021- 2022 वर्षाभरामध्ये हिंगोली जिल्हया अंतर्गत अर्जदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे मोबाईल गहाळ झाले बाबतचे अर्ज सायबर सेल , पोलीसअधीक्षक कार्यालय हिंगोली येथे दिले होते . मा . पोलीस अधीक्षक श्री . . राकेश कलासागर यांनी गहाळ मोबाईल बाबत सायबर प्रभारी अधीकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भाग्यश्री कांबळे यांना सायबर सेल येथील एक पथक तयार करून आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत सुचना दिल्या होत्या . त्यावरून सायबर सेल पोलीस पथकाने गहाळ मोबाईल अर्जाची छाननी करून त्यासंबंधीचे तांत्रिक विज्ञापन करून मोबाईल संदशनि अद्यावत माहिती हस्तगत केली . सदरील हस्तगत केलेल्या माहितीवरून मोबाईल हे विविध ठिकाणी कार्यन्तीत असल्याचे निदर्शनास आल्याने सायबर पथकाने अंदाजे 5,00,000 रु किंगतीचे एकुण 35 विविध कंपनीचे मोबाईल हस्तगत करून आज रोजी मोबाईलच्या मुळ मालकांना वितरीत केले आहे . तसेच यापुर्वी सन 2021 मध्ये एकुण 36 गहाळ मोबाईलचा सायबर सेलच्या मार्फतीने शोध घेवुन अर्जदार यांना परत करण्यात आले आहे . सदरची कार्यवाही मा . श्री एम . राकेश कलासागर , पोलीस अधीक्षक हिंगोली , मा.श्री यशवंत काळे अपर पोलीस अधीक्षक हिंगोली , श्री यतिश देशमुख , सहायक पोलीस अधीक्षक हिंगोली , श्री उदय खंडेराय पोलीस पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे यांचे महत्वपूर्ण कामगिरी
पथकास रिवार्ड जाहीर
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
यांचे आदेश
निरीक्षक स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस उपनिरीक्षक श्री . शिवसांब पेवारे , सायबर सेल प्रभारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भाग्यश्री कांबळे , सायबर पोलीस अंगलदार / प्रमोद थोरात , जयप्रकाश झाडे , दत्ता नागरे , रमा ठोके , रोहीत मुदीराज , सुमित टाने , इरफान पठाण यांचे पथकाने केली . आहे . सायबर सेल हिंगोली मार्फत नागरीकांना आवाहन करण्यात येते की , रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी मोबाईल सापडल्यास स्वतः न वापरता तात्काळ सायबर पोलीसांशी संपर्क साधावा . तसेच सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीची मैत्री स्विकारू नका , अनोळखी फोन कॉलवर आपली वैयक्तीक अथवा आपल्या बँक खात्याची डेबीट / केडीट कार्डचा सीव्हीव्ही कमांक , ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नये . ( कोणतीही बैंक फोनद्वारे आपल्या बँक खात्याची माहिती मागत नाही . ) कोणतेही अनोळखी अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करु नका , अनोळखी व्यक्तीने पाठवलेना " क्यु आर कोड स्कॅन करू नका , तरी नागरीकांनी कोणत्याही अमीषाला बळी न पडता सतर्क राहावे व आपल्या सोबत असे प्रकार पडल्यास तात्काळ जवळील पोलीस स्टेशनशी किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा ( संपर्क क .8669900676 ) तसेच ऑनलाईन तकार करण्यासाठी www.cybercrime.gov.in या संकेत स्थळाचा वापर करावा . असे आव्हान पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा