दिनांक 15 4 2019 रोजी तत्कालीन चौकी अंमलदार व त्याचे सोबत सहकारी पोलीस कर्मचारी यांचे नाकाबंदी चे दरम्यान कनेरगाव नाका येथे चेक पोस्ट चे ठिकाणी मेंढ्या भरलेला ट्रक क्रमांक एम पी 09 GG 58 68 मिळून आल्याने त्यावर गुन्हा दाखल करून जप्त करण्यात आला असता सदर ट्रक पोलिसाचे ताब्यातुन ट्रक चालक धारासिंग यशवंतसिंग सिसोदिया राहणार नागदा मध्य प्रदेश याने सदर ट्रक घेऊन गेला या घटने संबंधाने पोलीस कर्मचारी सचिन पांडुरंग इंगोले याने दिलेल्या फिर्यादीवरून सन 2019 मध्ये पोलीस ठाणे गोरेगाव गुन्हा क्रमांक67/2019 कलम 392 भा द वि प्रमाणे दाखल झाला सदरचे वाहन किंमत अंदाजे चार लाख रुपये पोलिसांच्या ताब्यातून जबरीने नेल्यामुळे पोलिसांसाठी एक आव्हान निर्माण झाले होते सदर गुन्ह्याचा सुरुवातीला तपास चार पोलिस अधिकारी यांनी केला त्यानंतर सदर गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी होऊनही गुन्ह्यातील गेलामाल व आरोपी बाबत शोध न लागल्याने सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील ठाणेदार गोरेगाव यांनी स्वतः कडे घेऊन मा पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर साहेब मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे साहेब मा सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख मा उपविभागीय पोलिस अधिकारी वाखारे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली त्यामध्ये त्यांनी पोलिस जमादार राहुल गोटरे व पोलीस नाईक काशिनाथ शिंदे यांचे पथक नेमून त्यांना सदर गुन्ह्यातील गेलामाल व आरोपी शोध संबंधाने सूचना दिली असता
सदर पथकातील कर्मचारी यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्ह्यातील गेला माल व आरोपी शोध संबंधाने विविध ट्रान्सपोर्ट वर गुप्त बातमीदार नेमले बऱ्याचजना कडे चौकशी केली असता सदर ट्रक चे पूर्ण हालचाली बाबत माहिती देणारे बातमी दाराचे वतीने सदर ट्रकचे लोकेशन घेतले असता सदर गुन्ह्या तील चोरीस गेलेला ट्रक हा तेलंगणामध्ये लसूण खाली करण्यास गेला असल्याचे खात्रीलायक समजल्या वरून व सदर ट्रक हैदराबाद नांदेड मार्गे येत असल्याची प्राप्त माहितीवरून पथकातील पोलिस जमादार राहुल गोटरे पोलीस नाईक काशिनाथ शिंदे हे प्राप्त माहितीवरून ट्रक येणारे मार्गावर थांबून शोध घेता सदर ट्रक क्रमांक MP 09 GG 5868 किमती अंदाजे चार लाख रुपये चा सदर गुन्ह्यातील गेला माल मिळून आला तेव्हा सदर ट्रक ला हिंगोली येथून क्रॉकरी चे ट्रान्सपोर्ट नगर इंदोर येथे भाडे आहे असे सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी बनाव तयार करून चतुराईने सदर ट्रक हिंगोली पर्यंत आणून नंतर त्यास पोलीस ठाणे गोरेगाव येथे आणून गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आले आहेतब्बल तीन वर्षांपूर्वी पोलिसाचे ताब्यातून चोरीस गेलेला ट्रक क्रमांक MP 09 GG 5868 किमती अंदाजे चार लाख रुपये चा एवढा मोठा कालावधी झाल्याने सदर ट्रक परत मिळण्याची शक्यता धूसर झाली असताना पोस्ट गोरेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व त्यांचे पथकातील पोलिस जमादार राहुल गोटरे पोलीस नाईक काशिनाथ शिंदे यांनी दाखविलेल्या जिकरीचे व योग्य नियोजनाचे प्रयत्नांना यश येऊन सदर ट्रक किमती अंदाजे चार लाख रुपये चा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक श्री राकेश कलासागर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री वाखारे साहेब यांनी अभिनंदन केले आहे
टिप्पणी पोस्ट करा