पाण्यासाठी सुराणा नगरातील महिला आक्रमक...!
गटविकास अधिकारी यांना धरले धारेवर
महिलांचे सीईओ ,पंचायत समितीकडे निवेदन
हिंगोली :
शहरालगत असलेल्या सुराणा नगरात नियमित पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हा परिषदेचे सीईओ व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.
या बाबत रंजना पाईकराव, ज्योती कापसे, रेखा कपाटे, सुषमा जाधव,
अरुणा रोडगे, अर्चना गव्हाणकर,
सुगंधा ढेपे, कविता पाईकराव, कविता जाधव, पुष्पा मोडक, ज्योती नागरे
आश्विनी घुगे, जयश्री वानखेडे, सुनिता माखणे, स्वाती लेकुळे, अंजली बुर्से आदींनी निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, सुरानानगर व रघुनंदन नगर याठिकाणी रस्ते , नाल्या नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
तसेच नियमित पाणीपुरवठा होत नाही या संदर्भात वेळोवेळी निवेदन दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा