नंदीबैल गणपती दूध पितोचमत्कार करून दाखवा व पाच लाखाचे बक्षीस मिळवा प्रकाश मगरे

नंदीबैल गणपती दूध पितो
चमत्कार करून दाखवा व पाच लाखाचे बक्षीस मिळवा 
प्रकाश मगरे 

महाराष्ट्र 24 न्यूज
6 मार्च 2022

सध्या मोठ्या प्रमाणात व्हाट्सअप  ग्रुप नंदीबैलाला दूध व पाणी पाजतांना  व्हिडिओ व्हायरल होत आहेत 
जगात कुठल्याही प्रकारचा चमत्कार नसतो जर कोणी चमत्कार करून दाखवल्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यास 25 लाखाचे बक्षीस देते व संपूर्ण जगात याबद्दल सहा कोटी चे आहेत 
नंदी दूध किंवा पाणी पितो असाच प्रकार 1995 मध्ये घडला होता तेव्हा सर्वत्र अशी अफवा पसरली होती की गणपती दूध पितो परंतु गणपती दूध पिणे किंवा नंदीबैल पाणी अथवा दूध पिणे हा कुठल्या प्रकारचा चमत्कार नाही हा एक  वैज्ञानिक सिद्धांत आहे ज्याला 'सरफेस टेन्शन' असे म्हटले जाते मराठीत आपण त्याला 'पृष्ठीय आकर्षण' असे म्हणतो चम्मच किंवा वाटी पाणी किंवा दुध भरून  वाकडी केल्यानंतर  एक थर जमा होतो रुंद प्रकारचा ठेबर्या प्रकारचा थर तयार होतो आणि त्याला कुठलीही गोष्ट टच केली तर ते पाणी त्या गोष्टीकडे आकर्षिले जातात आणि त्या भांड्यात अर्धा चमचा किंवा वाटीतला पाणी कमी होतं आणि असा भास होतो की ते पाणी पिले जाते म्हणून समज असा पसरतो की नंदी अथवा गणपती दूध पीत आहे किंवा पाणी पीत आहे आणि हा चमत्कार भासवला जातो या चमत्काराचा काही भोंदू लोक फायदा घेतात आणि महिलांना व इतर लोकांना नंदी दूध पीत आहे असा भास निर्माण करून चमत्कार झाल्याचे भासवतात
मंदिरातील महाराज भाविकांची  मोठ्या प्रमाणात  फसवणूक करू शकतात 
अशा कुठल्याही चमत्काराला बळी पडू नये असे 
अखिल भारतीय 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा  संघटक प्रकाश मगरे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क बोलताना सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने