जागतिक वन दिनानिमित्त वन परिक्षेत्र हिंगोलीच्या वतीने अभिनव पद्धतीने साजरा...!
वारंगा फाटा/-
- विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे व वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक यांचे मार्गदर्शनाखाली वारंगा फाटा वन उद्यान ता.कळमनुरी येथे वनपाल प्रिया साळवे यांनी अभिनव कल्पनेद्वारे साजरा करण्यात आला.
जागतिक वन दिनानिमित्त वन परिक्षेत्र विभागाच्यावतीने दि.२१ मार्च रोजी वारंगा येथील उद्यानास भेट देणार्या निवडक पर्यटकांना रोपटे भेट देऊन त्यांना वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे महत्व पटवून दिले. तसेच वन उद्यानास भेट देणार्या एका नवविवाहित जोडप्याच्या हस्ते वन उद्यानात वृक्षारोपण केले व त्यांच्या सुखी सहजीवनाची सुरुवात शुभ व विधायक कामाने करून दिली. त्यांना यावेळी रोप भेट दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनरक्षक सविता फड, आकाश ठोके, संतोष कचरे, माधव केंद्रे यांनी परीश्रम घेतले. सदरील उद्यान हिंगोली जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष राजेश्वरराव पतंगे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा