हिंगोलीत लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय महिलेवर बलात्कार

हिंगोली लग्नाचे अमिष दाखवून २३ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग केल्याने कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

अंबाजोगाई जिल्ह्यातील चतुरवाडी येथील २३ वर्षीय महिलेस प्रमोद बंड करे या आरोपीने तुझ्या सोबत लग्न करातो असे म्हणून तिच्याशी जवळीकता साधुन लग्नाचे अमिष दाखवुन मागील तिन महिन्यापासुन ते १० एप्रिल या दरम्यानच्या कालावधीत तिच्यावर वेळोवेळी

अतिप्रसंग करण्यात आला व इतर तिन आरोपीतांनी महिलेस प्रमोदशी लग्न करून देणार नाही व परत घरी आल्यास जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याने अंबाजोगाई ग्रामिण पोलिस ठाण्यात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद बंडू  करे, बंडू  ग्यानबाराव करे, कुसूम बंडु करे, कृष्णा बंडू  करे रा. वारंगा मसाई या तिघांवर गुन्हा नोंदविण्यता आला. ही घटना वसमत तालुक्यातील म्हातारगाव शिवारात घडल्याने हा गुन्हा वसमत ग्रामिण पोलिसाकडे वर्ग करण्यात आला. पुढील तपास सपोनि विलास चवळी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने