भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिस दलाचा तगडा बंदोबस्त;जिल्हयात ४४१ मिरवणुका/- अधिक्षक राकेश कलासागर यांची माहिती
हिंगोली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हयात ४४१ मिरवणुका काढण्यात येणार आहेत. सर्वांनी मोठया उत्साहात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, अशा शुभेच्छा देऊन भिमजयंतीनिमित पोलिस दलाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी दिली. यावेळी त्यांनी जयंती उत्सवात डी.जे. वाजविण्यावर संपुर्णता बंदी असुन कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी बुधवार दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी हिंगोली जिल्हयात एकुण ४४१ मिरवणुका निघणार आहेत. दि.१४ एप्रिल रोजी १७७ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. दि.१४ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत ४४१ मिरवणुकांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्हयात पोलिस ठाणे स्तरावर संपुर्ण पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तात जिल्हयात तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, ६६ वरिष्ठ पोलिस अधिकारी, एक एसआरपीएफ ची तुकडी, राखीव पोलिस दलाची दोन आरसी प्लाटुन, ५०० पोलिस कर्मचारी, २०० पुरुष होमगार्ड व ५० महिला होमगार्ड हे कर्तव्यावर उपस्थित राहणार आहेत. हा बंदोबस्त दि.३० एप्रिल पर्यंत कायम राहणार असुन आगामी सण उत्सवातही हाच बंदोबस्त कायम राहणार आहे. यामध्ये रमजान ईद व जयंती उत्सवाचा समावेश आहे. यापुर्वी जिल्हयातील प्रत्येक पोलिस ठाणे स्तरावर तसेच जिल्हास्तरावर शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिस विभागाच्या व शासनाच्या नियमावलीची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये डी.जे. ला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. डी.जे. लावल्यास व तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल. जयंती उत्सवानिमित्त पुर्वीचे मार्ग मिरवणुकीसाठी कायम ठेवावेत अशाही सुचना करण्यात आल्या आहेत. सण उत्सवामध्ये पोलिस दलाच्यावतीने नेहमीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. त्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीकोणातनु नोटीसही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. सर्व मिरवणुकीच्या आयोजकांना स्थानिक स्तरावर पोलिस ठाण्यातुन परवानगी घेण्याचे सुचीत करण्यात आले आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत . भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या
إرسال تعليق