*देश महापुरुषांच्या विचारानेच प्रगती करेल.* कैलास भुजंगळे शिक्षण विस्ताराधिकारी.
_________________________
हिंगोली :प्रतिनिधी
माणूस जाणीवेतून शिकतो, त्यासाठी गुलामीची जाणीव झाली पाहिजे, व्यवस्थेपुढे सत्य सांगण्याचे मांडण्याचे धाडस क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनीच केले, महात्मा फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक नवं राष्ट्राची निर्मिती केली ते या राष्ट्राचे निर्माते झाले, हा भारत देश महापुरुषांच्या समताधिष्ठित, न्याय,विचारानेच प्रगती करेल असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी कैलास भुजबळ यांनी सामाजिक न्याय भवनात जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दिनांक : 11एप्रिल सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्येक्रम निमित्ताने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यान कार्यक्रम व जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू एडके समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जात पडताळणी चे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, श्रीराम जामगे पाटील पोलीस निरीक्षक हिंगोली शहर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एम. आर. राजूलवार, महात्मा फुले विकास महामंडळाचे श्री बागुल श्री वाघमारे, मुदीराज साहेब, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे प्रवीण रुईकर, भीमशक्तीचे विशाल इंगोले, आदींच्या उपस्थितीत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांनी तर सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या वतीने उपस्थित मान्यवर,जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजू एडके साहेब यांच्या हस्ते सौरव कांबळे, नेहा पठाण, धीरज बगाटे आदींना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार समतादूत सुरेश पठाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नागनाथ नकाते, सखाराम चव्हाण, संदीप घनतोडे, दीपक कांबळे, राहुल भराडे, विधीतज्ञ विनोद ठाकरे, गजानन कोरडे पोलीस , समतादूत प्रफुल पट्टेबहादूर, भास्कर वाकळे, आनंत बिजले, सुनील वडकुते, रितेश बगाटे, सिंधुताई राठोड, ढोणे मॅडम ,पल्लवी गीते, नितीन राठोड, मोतीराम फड, सुकेशनी होडगिर, खंदारेताई, मीना बांगर, बिहाडे, रवी कोळी, विजय आयरेकर, पुंडगे,शुभम यादव, शेषराव पिंपरे, जाधव, पडघान समाज कल्याण बार्टी व जात पडताळणी चे कर्मचारी सह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा