डाॅ. दिपक मोरे यांचा आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आरोग्य भुषण पुरस्कार देऊन गौरव
हिंगोली/
आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल न्यूज लाईन तर्फे डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य भूषण पुरस्कार देऊन मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थित मुंबई येथे गौरव करण्यात आला.
न्यूज लाईन तर्फे सह्याद्री पुरस्कार २०२२ चे वितरण करण्यात आले . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना सह्याद्री पुरस्काराने गौरविण्यात आले .हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाला. आरोग्य भूषण पुरस्कारासाठी या न्यूज लाईन संस्थेने हिंगोली येथील सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे यांची निवड केली होती.
या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. दीपक मोरे यांना आरोग्य पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा