मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न.

*मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न.*
हिंगोली प्रतिनिधी
        सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त मार्जिन मनी योजना माहिती कार्यशाळा घेण्यात आली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर व उद्योजक यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
      समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एम आर राजू लवार यांनी उपस्थितांना मार्जिन मनी योजना संदर्भात सखोल अशी माहिती दिली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत  अशोक इंगोले यांनी केले.
    यावेळी डॉ. के.के. वाघमारे, महादेव खंदारे चर्मकार महासंघाचे अध्यक्ष, नितीन धाबे राऊत श्री खंदारे सुशांत कुलदीपके,जाधव , विशाल कुबडे, प्रफुल पटेलबहादुर, श्री टापरे ,आदींची उपस्थिती होती. शेवटी उपस्थितांचे आभार समता दूत  सुरेश पठाडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने