जननी कार्यक्रमामुळे इसापुर तांडा येथे बालविवाह रोकला
सहायक पोलिस निरीक्षक राजेश
मलपिल्लू
महाराष्ट्र 24 न्यूज
17 एप्रिल 2022
हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतुन जननी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची जनजागृती केली जात आहे. महिला व बालकावरील होणारे अत्याचार थांबवुन त्यांना सुरक्षेबाबत कायदे व नियमाची माहित दिली जात आहे..
या व्यापक उपक्रमाचे फलीत चांगलेच मिळत आहे. इसापुर तांडा येथे बालविवाह बाबत पोलिस डायल ११२ वर माहिती दिली होती. बासंबा ठाण्याचे सपोनि राजेश मलपिल्लु यांच्यासह प्रविण राठोड, बंडु राठोड, वंदना ढवळे आणि जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मालती कोरडे आणि त्यांच्या पथकाने १७ एप्रिल रोजी इसापुर तांडा येथे जावुन बालविवाह थांबविला. यावेळी वधु व वराकडील नातेवाईकांचे प्रबोधन सपोनि मलपिल्लु व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कोरडे यांनी केले.
ईसापुर तांडा येथील बालविवाह रोखल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश
मलपिल्लू यांचे तात्काळ कारवाई बद्दल कौतुक होत आहे
टिप्पणी पोस्ट करा