अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची स्थापना पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांचा उपक्रम



अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची स्थापना. पोलीस अधीक्षक  कलासागर यांचा उपक्रम 

हिंगोली
येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कखाची स्थापन करण्यात आली आहे. 
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालकांच्या अनैतिक मानवी वाहतुकी संदर्भात गंभीर गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवार दि.१९ एप्रिल रोजी सदर कक्षाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, होम डीवायएसपी विश्‍वनाथ झुंजारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उदय खंडेराय, भरोसा सेलचे सपोनि श्रीमती विशाखा धुळे यांची उपस्थिती होती.  या कक्षामार्फत जिल्हयातील हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुला-मुलींचा यांच्याशी संबंधित दाखल गुन्हयामध्ये पिडीत मुले-मुली यांचा पोलिस स्टेशन कडून चार महिन्याच्या कालावधीमध्ये शोध लागत नसल्यास सदर कक्षाकडे सदरील गुन्हा वर्ग होऊन तपास करण्यात येणार आहे. जिल्हयात अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्या करिता अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातुन हे कार्य सक्रियपणे राबविण्यात आहे. या कक्षामध्ये एक डीवायएसपी, एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि नऊ पोलिस कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने