आज दिनांक 22 एप्रिल 2022 रोजी मिशन वात्सल्य योजने अंतर्गत सर्व तालुका स्तरीय समितींच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी श्री गणेश वाघ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) यांचे अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन नक्षत्र सभागृह जिल्हा परिषद हिंगोली येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले. सदरील बैठकीस श्री. शिंदे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी /कर्मचारी, सर्व तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक २७ ऑगस्ट २०२१ नुसार,जिल्ह्यातील कोरोना मुळे एकल / विधवा झालेल्या महिला व अनाथ बालके यांना मिशन वात्सल्य योजने अंतर्गत शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित, जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या कामकाजात एकसूत्रता व गतिमानता आणण्यासाठी तालुकानिहाय अधिकारी / कर्मचारी यांचे पथक गठित करण्यात आले. व मिशन वात्सल्य योजने अंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन त्यांचे सर्वेक्षण करणे व त्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
إرسال تعليق