बलात्कारप्रकरणी भाजपाच्या माजी नगराध्यक्षांसह पुत्रावर गुन्हा दाखल
हिंगाेली : भाजपाच्या माजी नगराध्यक्षाच्या पुत्राने हिंगाेली शहरातील विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी तर माजी नगराध्यक्षांनी संबंधित पिडीत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या पिता, पुत्रावर हिंगाेली शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंजारवाडा येथे राहणाऱ्या राेहन बाबाराव बांगर याने एका 22 वर्षीय विवाहितेवर खिशातील रूमाल ताेंडात दाबून बळजबरीने बलात्कार केला. तर त्याचे वडील भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी झालेली घटना काेणाला सांगू नकाेस, आमची बदनामी हाेईल. कुणाला सांगितले तर तुला खतम केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणून धमकावल्या प्रकरणी हिंगाेली शहर पाेलीस ठाण्यात या बाप-लेकाविरूध्द पिडीत विवाहित महिलेच्या तक्रारीवरून कलम 376, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 13 जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2022 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पती, सासरी नांदावयास घेवून जाईल या आशेमुळे या प्रकरणाची मी वाच्यता केली नाही. पण आजतागायत पती मला सासरी घेवून जाण्यासाठी आलेला नाही म्हणून गुन्हा दाखल करत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. घटनास्थळी पाेलीस निरीक्षक एस.एस.आमले यांनी भेट दिली असून पुढील तपास पाेउपनी देशमुख हे करीत आहेत. या प्रकरणामुळे जिल्हृयाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा