व्यापारी महासंघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी...!
पालीकेकडे सर्व कर भरुनही सुविधा मात्र मिळत नाहीत ; हिंगोली पालिकेची अग्नीरोधक यंत्रणा वेळेवर न आल्याने व्यापार्याचे मोठे नुकसान
हिंगोली /-
शहरातील मुख्य बाजारपेठेतील राम अग्रवाल यांच्या होलसेल किराणा दुकानाला मध्यरात्री आग लागुन व्यापार्याचे मोठे नुकसान झाले आहे. न.प.अग्नीशामक दलाचे पथक वेळेवर न आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नसुन व्यापार्यांना सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाने वेळेवर उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना शुक्रवार दि.८ एप्रिल रोजी व्यापारी महासंघाने निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये व्यापारी हा असा घटक आहे जो देशामध्ये सर्व देशवासींयाना सर्वात जास्त सेवा देणारा घटक आहे. दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या संकटापासुन थोडा सावरलेला असतांना सोयी सुविधांच्या अभावामुळे व्यापार्यांचे अतोनात हाल होत आहेत. व्यापारी आपले कर्तव्य समजुन न.प.प्रशासनाकडे सर्व शासकीय कर नळपट्टी, घरपट्टी, घंटागाडी पट्टी व इतर न मिळणार्या सर्व सुविधांचे कर नियमित व वेळोवेळी शासनास भरणा करत आलेले आहेत. परंतु व्यापारी बांधवाना प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणुक देण्यात येते आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस सुर्य कोपला असुन व्यापार्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दि.७ एप्रिल रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील राम अग्रवाल यांच्या होलसेल किराणा दुकानाला आगीने विळखा घातला असुन व्यापार्याचे मोठे नुकसान झाले आहे. न.प.अग्नीशामक दलाचे पथक वेळेवर न आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे संबंधीत व्यापार्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतरही अशा घटना घडु नयते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर नियत्रंण ठेवावे. तसेच लोडशेडींचे प्रमाण वाढले असुन त्यामुळे व्यापार्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यापार्यांच्या हितासाठी अग्नारोधक यंत्रासह विशेष विभाग स्थापन करुन आवश्यक त्या संपुर्ण सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे, प्रकाशचंद्र सोनी, माजी नगराध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, आनंद निलावार, मुरलीधर हेडा, पंकज अग्रवाल, सुदर्शन कंदी आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा