हिंगोलीत निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या उपस्थितीत विशाल सत्संग
हिंगोली:येथे निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अध्यक्षते खाली दि. ६ मे शुक्रवार रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळात रामलीला मैदान येथे विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संत समागमा मध्ये हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित राहणार आहेत.
संत निरंकारी मंडळाचे हिंगोली संयोजक कन्हैयालाल नेनवाणी यांनी सांगितले की,समागमाची जय्यत पूर्वतयारी झाली आहे.येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून समागम स्थळाच्या साफसफाई बरोबरच प्रबंध व्यवस्थेवरही विशेष लक्ष दिले जात आहे. समागम स्थळी दाखल होणाऱ्या भाविकांनी मोबाइल चा वापर करूनये विशेषतः महिलांनी किमती दागिने अंगावर घालू नये, फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करू नये सर्वांनी शांततेच सहकार्य करावे, पार्किंग स्थळी वाहने लावावीत असे आवाहन करून ते पुढे म्हणाले की,
संत निरंकारी मिशन हे विश्वबंधुत्व आणि वसुदैव कुटूंबकमची भावना पसरवत आहे. सत्य ज्ञानाच्या प्रकाशाबरोबरच भक्तगणामध्ये जनकल्याण करणारी परोपकाराची भावनाही निर्माण करत आहे.या संत समागमामध्ये भाविक भक्तगणांना सदगुरुच्या दिव्य दर्शनाबरोबरच त्यांच्या अमृतमय प्रवचनाचाही लाभ होणार आहे. तत्पुर्वी मिशनचे वक्ता व्याख्यान गीत, भजन, कविता इत्यादी माध्यमातुन सत्याचा संदेश प्रसारित करतील समस्त जिज्ञासु व जनसामान्य लाभान्वित होतील. या संत समागमात प्रेम व बंधु भावनेचा अदभुत संगम पाहायला मिळेल
आपण सर्व मित्रगण आणि सहपरिवारासहित या विशाल संत्संगाचा लाभ घ्यावा ही विनंती संयोजक कन्हैयालाल नेनवाणी व सत्संग परिवाराच्या वतीने केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा