जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या सदस्य पदी ज्योतीताई कोथळकर यांची निवड
हिंगोली
महिला व बाल विकास अधिकारी विभागाच्या जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या सौ.ज्योतीताई शिवाजीराव कोथळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाल न्याय (मुलांच्या काळजी व संरक्षण) २०१५ च्या कलम ५४ नुसार संस्थांच्या तपासणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर तपासणी समिती गठीत करण्यासाठी शासन निर्णयान्वये महिला व बाल विकास विभाग दि.२१ मार्च २०१८ नुसार निर्गमीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये अशासकीय व्यक्तीच्या नियुक्ती करिता अध्यक्ष जिल्हास्तरीय तपासणी समिती तथा जिल्हाधिकारी यांचे मान्यतेनुसार जिल्हयाकरिता अशासकीय सदस्य म्हणुन सौ.ज्योतीताई शिवाजीराव कोथळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी आदेश काढले आहेत. ज्योतीताई कोथळकर यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असुन महिला सक्षमीकरणात त्याचे महत्वाचे काम आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा