स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांची
अवैध गुटखा विरोधात मोठी कारवाई सहा लाख 57 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त
हिंगोली प्रतिनिधी
दिनांक ०५/०६/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गोपनीय माहिती मिळाली प्रमाणे नांदेड इथून अवैधरित्या विक्री करिता कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा हिंगोलीत येणार आहे. अश्या माहिती वरून स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शन प्रमाणे सपोनि राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार आकाश टापरे ,शेख जावेद, सुमित टाले यांनी नागेश वाडी फाटा येथे अतिशय गोपनीय पद्धतीने सापळा लावून रात्री 23.00 वाजता सुमारास नमूद नांदेड येथून गुटखा घेऊन येणाऱ्या कार क्रमांक MH 03 AR ९७३५ ला पकडून नमूद वाहनाची तपासणी केली असता त्यात एकूण 84 प्ल्यस्टिक थैलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी आरोग्यास हानिकारक सुगंधित पान मसाला, गुटखा त्यात राज निवास, विमल, गोवा व इतर सुंगधित पान मसाला व गुटखा एकूण 02 लाख 57 हजार रुपयाचा मिळून आला. पोलिसांनी नमूद गुटखा व सदरची i 20 कार किंमत अंदाजे 04 लाख असा एकूण 06 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करून सपोनि श्री. राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून पोस्टे हट्टा येथे नमूद माल घेऊन जाणारा कार चालक सय्यद अन्वर हुसेन रा. तोफखाना हिंगोली व नमूद मुद्देमाल विक्री करणारे नांदेड चे गोल्डन जर्दा दुकानाचे चालक फहीम व अकबर राहणार देगलूर नाका नांदेड यांच्या विरोधात.गुरनं - २२६/२०२२ कलम ३२८,२७२,२७३,१८८, भा द वी सह कलम २६(२)(iv),२७(२)(e),३०(२)(a),५९ अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या कारवाईने अवैध गुटखा व मटका चालकांचे धाबे दणाणले
टिप्पणी पोस्ट करा