व्हाट्सअप फेसबुक स्टेटस वर अफवा पसरणाऱ्या वर कठोर कारवाई
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
हिंगोली प्रतिनिधी
11जून 2022
जिल्ह्यातील
सर्व नागरिकांना जिल्हा पोलिस दला तर्फे आवाहन करण्यात येते की ,कोणीही कोणत्याही जाती,धर्म,वंश, यांचा किंवा कोणत्याही महापुरुषांचा अपमान होईल किंवा दोन समाजात तेड निर्माण होईल असे किंवा खोटी अफवा पसरवणारे म्यासेज ,फोटो कोणाला पाठवू नये/आलेला म्यासेज,फोटो फॉरवर्ड करू नये किंवा आपले वॉटसप स्टेटस ला ठेवू नये , हिंगोली पोलीस दलाचे सायबर सेल ची सर्वांवर बारकाईने नजर असून आपण तसे केल्यास आपले विरुद्ध योग्य ती कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
तसेच आपले गावात ,गल्लीत इतर कोणी असे स्टेटस ठेवले आहे ,किंवा कोणी असे msg ,फोटो पाठवत आहे, खोटी अफवा पसरवत आहे हे आपले निदर्शनास आल्यास आपण देशाचे सुजाण नागरीक बनून त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी ,माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून आरोपी विरुद्ध तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
हिंगोली शहरातील एका वर कठोर कारवाई करून त्याला अटक करण्यात आले
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीस
आज शहर पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी
महाराष्ट्र 24 न्युज ला बोलताना माहिती दिली
टिप्पणी पोस्ट करा