राज्यस्तरीय खो-खो स्पर्धे निमित्त रविवारी बैठकीचे आयोजन
हिंगोली/- प्रतिनिधी
येथे तालुका खो-खो संघटना हिंगोली च्या वतीने राज्यस्तरीय पुरुष- महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनने हिंगोली येथे राज्यस्तरीय ५५ वी पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०२२/२३ आयोजित करण्याचा बहुमान दिला आहे.
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्य भव्य दिव्य अशा खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील स्पर्धेत महाराष्ट्रातून पुरुष, महिला दोन हजार खेळाडू व पंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सदरील स्पर्धेच्या नियोजन प्रथम बैठक रविवार दि. १२ जुन रोजी सकाळी ठीक ९:00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आयोजित केली आहे.
बैठकीस सन्माननीय लोकप्रतिनिधी,
जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व क्रीडाप्रेमींनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन हिंगोली तालुका खो-खो संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा