बँक अधिकारी यांच्या कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बचत गटांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बँकांनी प्रलंबित खाते उघडून पात्रतेनुसार कर्ज वितरित करावे

बँक अधिकारी यांच्या कार्यशाळेमध्ये जिल्हाधिकारी यांनी बचत गटांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बँकांनी प्रलंबित खाते उघडून पात्रतेनुसार कर्ज वितरित करावे दिल्या सूचना

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत  हिंगोली जिल्ह्यात सन 2018 पासून  इंटेन्सीव पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी चालू असून यामध्ये विविध प्रकारच्या समुदाय स्तरीय संघ संस्था स्थापन करून त्यांची क्षमता बांधणी केले जाते व त्याना शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जातो
आज दिनांक 21 जून 2022 रोजी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत   डीपीसी हॉल जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण यंत्रणा मार्फत  प्रकल्प संचालक श्री विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील सर्व बँक अधिकारी यांची एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली.  सन 2022-23 या वर्षात  बचत गटाच्या कर्ज वितरण व त्यांचे खाते उधडण्याचे उद्दिष्ट  विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या  कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली श्री संजय दैने जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री जे .व्ही. मोडके लेखा अधिकारी श्री मनोज पिनगाळे राज्य प्रशिक्षक के.बी.दीक्षित,जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत,ओमप्रकाश गलांडे  राजू दांडगे  सर्व बँक मॅनेजर उपस्थित होते.
जिल्ह्यातील बँक अधिकारी व उमेद अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे पहिल्या त्रेमासीक मध्ये कर्ज वाटपासाठी ज्या बँकांनी पुढाकार घेतला त्यांचे अभिनंदन करून सर्व बँकांनी 
  वेळेत पात्र बचत गटांचे कर्ज प्रस्ताव बँकेमध्ये सादर करणे व त्याचे  वाटप सुद्धा नियमित  करणे व प्रलंबित जिल्ह्यातील सर्व बचत गटाचे खाते 30 जून पूर्वी उघडण्याबाबत सूचना दिल्या तसेच सर्व बँक व्यवस्थापक यांनी बचत गटा विषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पात्रतेनुसार  जास्तीत जास्त कर्ज वितरित करून  उमेद अंतर्गत गरीब  महिलाना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक स्रोत तयार करण्यासाठी  लघुउद्योग तयार करून   त्यांच्या उपजीविका वाढवण्यासाठी मार्गदर्शन करून  हातभार लावावा अशा सूचना दिल्या
      सदर कार्यशाळेमध्ये सर्व बँका अधिकारी उमेद अधिकारी कर्मचारी यांना आर्थिक समावेशन च्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यासाठी राज्य स्तरावरून राज्य प्रशिक्षक श्री के.बी दीक्षित साहेब उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक श्री राजू दांडगे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री जे.व्ही. मोडके   यांनी जिल्ह्यात चालू वर्षातील उद्दिष्ट व कर्ज वाटप बँक प्रलंबित बँक खाते बाबत माहिती दिली  आभार जिल्हा व्यवस्थापक श्री विक्रम सारस्वत व ओमप्रकाश गलांडे यांनी केले सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी उमेद अंतर्गत कार्यरत  सर्व तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन ,प्रभाग समन्वयक व बँक सखी यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने