रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातून मोटर सायकल रॅली

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रॅली
महाराष्ट्र 24 न्यूज
प्रतिनिधी हिंगोली 
22जून2022
हिंगोली येथील 
संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे आज सकाळी 10 वाजता सडक सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून आज सकाळी 10  वाजता मोटरसायकल रॅलीला  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली 
.यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंता जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी वाखारे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस निरीक्षक सय्यद, आरटीओ जगदिश माने, आरटीओ, नलीनी काळपांडे, आरटीओ पवार, आरटीओ हराळ, आरटीओ कोपुल्ला, आरटीओ तडवी, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास आघाव, एन.सी.सी.चे मेजर पंढरीनाथ घुगे, क्रीडा प्रमुख आनंद भट्ट, सपोनी मलपिल्लू, यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते. मोटर सायकल रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने