समाधान शिबिरात जिल्हाधिकार्यांनी साधला नागरिकांशी संवाद...!
प्रशासन आपल्या दारी असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हमी...!
हिंगोली प्रतिनिधी
10जून 2022
जनता आणि प्रशासनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी आखाडा बाळापूर येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित समाधान शिबिर पार पडले. या शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या .विविध विभागांचे विभाग प्रमुखांना सूचना देऊन तातडीने त्यांचा निपटारा करण्याचे आदेश दिले. जनता आणि प्रशासनातील संबंध वाढवत एकमेकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी हे शिबिर उपयोगी पडले. प्रशासन नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तयार असल्याचे आज जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. ,
कळमनुरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या पुढाकारातून सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत आज दिनांक 10 जून रोजी आखाडा बाळापुर येथे समाधान शिबीर पार पडले. येथील शिबिरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार सुरेखा नांदे, आखाडा बाळापुरच्या सरपंच भिमाबाई नरवाडे, कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश साहू यांच्यासह सर्व विभाग प्रमुख , महसूल मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश होता .कृषी विभागाच्या वतीने नऊ लाभधारकांना ट्रॅक्टर व रोटावेटर चे वाटप करण्यात आले .शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले .बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे बचत गटांना कर्जाचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्ती व शेतकरी आत्महत्या यांच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आले. विविध प्रमाणपत्रांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासनाच्या कामकाजाची पद्धत समजावून सांगत जिल्हा प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर असल्याची हमी दिली. नागरिकांशी थेट संवाद साधत वेगवेगळ्या विभागातील अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले .ज्या लोकांच्या विविध विभागांच्या तक्रारी असतील त्यांचा पंधरा दिवसात निपटारा करण्याचे आदेशही विभागप्रमुखांना दिले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले. तर आभार तहसिलदार सुरेखा नांदे यांनी मानले .या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तलाठी विनोद ठाकरे, बाळापुर मंडळाचे मंडळाधिकारी ए.एम सुळे, बाळापुर तलाठी सज्जाचे तलाठी गोविंद भोरगे,आर.एन.सावंत , संतोष शेवाळकर , तलाठी गिरी ,नायब तहसीलदार सतीश पाठक , इंगोले,बालाजी रेड्डी,महेश हिवरे, आ.क कोकरे,प्रेम चव्हाण,क्षिरसागर ,अमोल पतंगे,अंकुश फुलते,यांच्यासह सर्व आधिकार्यांनी परिश्रम घेतले. यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वेगवेगळ्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश कदम यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा