बहिण भावाचे भांडण विकोपाला दोघांची आत्महत्या

बहिण भावाचे भांडण विकोपाला    दोघांची  आत्महत्या 

आ.बाळुपर  प्रतिनिधी 
 कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे चुलत भाऊ बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन्ही मृतदेहावर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार दि.१४ जुन रोजी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. ऐश्वर्या पंडित (१८) व आनंदा पंडित (२८) अशी मृत झालेल्या व्यक्तींचे नावे आहेत.
डोंगरकडा येथे ऐश्वर्या पंडित व त्यांचा चुलत भाऊ आनंदा पंडित हे एकाच गल्लीमध्ये राहतात. सोमवार दि.१३ जुन रोजी सायंकाळी सहा वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून ऐश्वर्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, राजेश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.
दरम्यान आज पहाटे आनंदा पंडित यांनी डोंगरकडा शिवारामध्ये एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी डोंगरकडा येथे जाऊन आनंदा यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथे आणला आहे. मृत आनंदा पंडित व ऐश्वर्या पंडित हे दोघेजण चुलत भाऊ बहीण आहेत. दरम्यान या दोघाची भांडण झाले होते   पोलिसांनी सांगितले. तर या प्रकरणी  अक्समात नोंद आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात झाली आहे 

पुढील तपास बाळापुर ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोदनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने