हिंगोली जिल्हा पोलीस मुख्यालय येथे जातीय सलोखा, शांतता बैठक संपन्न
हिंगोली जिल्हयामध्ये जातीय सलोखा अवधीत राहुन शांतता नांदावी या करीता मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांनी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शांतता समिती बैठकिचे आयोजन केले होते. सदर जातीय सलोखा व शांतता बैठकिस पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, औंढा नागनाथ नगर पंचायतचे नगराध्यक्ष श्री. राजु खंदारे, माजी उपनगराध्यक्ष हिंगोली नगर परीषद श्री. दिलीप चव्हाण, मुफ्ती शफीक शेख नेहाल ठाकुरसिंग बाबरी तसेच हिंगोली, कळमनुरी, वसमत औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील सर्व धर्मीय प्रतिष्ठीत नागरीक धर्मगुरू विवीध क्षेत्रातील मान्यवर मिडीया प्रतिनीधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नमुद शांतता बैठकिचे प्रास्तावीक अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांनी केले त्यात जिल्हयातील शांतता व जातीय सलोखा टिकवून ठेवणे हे प्रत्येकाची जबाबदारी असुन सध्याच्या वातावरणात जिल्हयामध्ये कोणतेही धार्मीक भावणा दुखावणारे कृत्य कोणीही करू नये तसेच कुठेही कायदयाचे उल्लंघन होत असेल व कोणीही आक्षेपार्ह कृत्य करत असेल तर त्यावर तात्काळ पोलीसांकडुन कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल विणाकारण कोणीही कायदा हातात घेवु नये व कोणाच्याही दबाव व चुकीच्या अफवांवर विश्वास नये सोशल मिडीया व्हॅटसअॅप, फेसबुक व ईतर साधणांचा वापर अतिशय दक्ष राहुन करावा आपले मुल काय करत आहेत कुठले कृत्य त्याच्याकडुन होत नाही ना याकरीता पालकांनी व आपण समाजातील सर्व प्रमुख व्यक्तींनी दक्षता घ्यावी असेही आवाहन केले. प्रास्तावीक नंतर सदर शांतता बैठकिस उपस्थित सदस्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून जातीय सलोखा अबाधीत राहावी याकरीता सुचना सांगुन प्रत्येकांनी जिल्हयात शांतता राखणेकरीता सर्व परीने व एकजुटीने प्रयत्न करू अशी भावणा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे शेवटी मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर यांनी मार्गदर्शन केले त्यात हिंगोली जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा असुन जिल्हयातील सर्व धर्मीय नागरीकांनी मागील सर्व सण उत्सव अतिशय आनंदात व शांततेत तसेच नियमांचे पालन करून साजरे केल्याबददल सर्वांचे धन्यवाद मानले. सर्व धर्मीयांनी एकजुटीने एकमेकांचे आदर व सन्मान करून शांतता राखावी कोणी समाज कंटक जाणुन बुजुन समाजात द्वेश पसरवत असेल तर तसे काही घटक प्रयत्न करत असतील तर सर्वांनी एकजुटीने मिळुन त्यास विरोध करून कायदेशिर कार्यवाहीत पोलीसांना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच सर्व नागरीकांनी सोशल मिडीआचा वापर अत्यंत दक्ष राहुन करण्याची सुचना केली. तसेच बैठकितुन आलेल्या सुचननेनुसार पुढील काळात हिंगोली जिल्हयातील सामाजिक व जातीय सलोखा करीता पोलीस दलाकडुन क्रिकेट मॅच व ईतर खेळ, वृक्षारोपन, ब्लड डोनेशन इ. उपक्रम राबविणार असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे यांनी तर सदर शांतता बैठकीचे आयोजन व यशस्वितेकरीता पोलीस निरीक्षक हिंगोली शहर श्री. पंडीत कच्छवे, पोउपनि पाटील, मुळतकर यांनी प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा