२०२२ रोजीचे रात्रौ दरम्याण हिंगोली जिल्हयातील कळमनुरी शहरातील साई नगर परीसरातील मोकळ्या मैदानावर त्याच परीसरात राहणा-या निकेश कांबळे, वय २३ वर्ष या युवकाचा मृतदेह मिळून आला होता. नमुद मयत युवकास दगडाने व ईतर साधानाने मारहाण करून गंभीर दुखापत करून त्यांचा खुन केला गेला होता. त्याबाबत नमुद मयताचे आईचे तकारी वरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे गुरनं. २४९/२०२२ कलम ३०२ भादंवी. अन्वये दिनांक १४/०६/२०२२ रोजी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मयत निकेस काबले
नमुद गुन्हयाच्या घटनास्थळी तात्काळ पोलीस स्टेशन कळमनुरी व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोहचुन तपासाला सुरूवात केली. घटनास्थळी श्वान पथक व अंगुली मुद्रा पथक यांनीही पाहणी केली होती. नमुद गुन्हयातील आरोपी अज्ञात असल्याने तपास पथकापुढे तात्काळ गुन्हा उघड करून आरोपींना अटक करण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले होते.
घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे यांनीही तात्काळ भेट देवुन घटनास्थळ व परीसराची पाहणी करून दिवसभर पोलीस स्टेशन कळमनुरी येथे थांबुन तपास पथकांना सुचना व मार्गदर्शन करत होते. गुन्हयाचा तपास व आरोपी शोध करून गुन्हा उघडकिस आणणे करीता पोलीस स्टेशन कळमनुरी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार असे ०३ तपास पथकाने तंत्रशुध्द पध्दतीने विवीध दिशेने तपासाची चक्रे फिरवुन सायबर सेल हिंगोली व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने अवघ्या १२ तासाच्या आत गुन्हयात
सहभागी दोन्ही आरोपी (१) अभिजीत बाबाराव मस्के वय २३ वर्ष रा. शास्त्री नगर कळमनुरी (२) आकाश विठठल सातव वय २४ वर्ष रा. कळमनुरी यांना शिताफीने ताब्यात घेवुन विचारपुस करून आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो. नि. श्री. सुनिल निकाळजे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कळमनुरीचे पो. नि. श्री. सुनिल निकाळजे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. सुनिल गोपीनवार, सपोनि. राजेश मलपिलु, सपोनी रवि हुंडेकर, मपोउपनि श्रीमती बी.एस. गजभारे पोलीस अंमलदार पो. हव सोपान सांगळे, पोहव भारत घ्यार, पोहवा, संभाजी लेकुळे, एस. एस. रिठठे, मपोहवा पारू कुडमेथे, सुनिता धुळे, सुनिता धनवे, आर. व्ही. वर्षे, एस.डी. उपगरे, पो.ना. किशोर कातकडे, राजु ठाकुर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विठठल काळे, माधव भडके, पवन चाटसे, चव्हाण, गजानन होळकर, शशिकांत भिसे, जाधव, कांबळे, डोकळे, बेले, सुमित टाले, दत्ता नागरे, रोहीत मुदीराज यांनी सहभाग नोंदविला होता
टिप्पणी पोस्ट करा