भक्तीरसात दंग वारकरी पावसात भिजले; उदंड उत्साहात दर्शनासाठी गर्दी
हिंगोली प्रतिनिधी
16जून2022
गत ५३ वर्षापासुन आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवार दि.१६ जून रोजी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे आगमन झाले. पावसाची झड आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भक्तीरसात वारकरी दंग होते. भाविक भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. श्री चा पालखी सोहळा दोन दिवस हिंगोली जिल्हयात मुक्कामी आहे.
श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याचे आयोजन मागील ५३ वर्षांपासून केले जात आहे. सुमारे ७५० किलोमीटर अंतर पायी चालून पालखी पंढरपुरात दाखल होते. या पालखी सोहळ्याचे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांना आकर्षण असते. दरम्यान आज सकाळी आठ वाजता गण गण गणात बोते, तसेच हरिनामाच्या गजरात निघालेला पालखी सोहळा मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा या संस्थेच्या गेट समोरुन श्री गजानन महाराज दिंडी चे आगमन झाले. यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब, उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राचार्य अभिषेक बेंगाळ,अभिलाषा बेंगाळ व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते गजानन महाराज चे सर्व सेवाधारी व भक्तांना फळाचे वाटप करण्यात आले. पानकनेरगाव येथे दाखल झाला. सुमारे ७०० पेक्षा अधिक वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली आहेत. पालखी सोहळा मराठवाड्यात दाखल होताच आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे संजय उर्फ भैय्या देशमुख, पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, गटविकास अधिकारी गोरे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते. एवढी भाविकांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पालखी सोहळा सेनगाव येथे मुक्कामी थांबली आहे.
टिप्पणी पोस्ट करा