हिंगोलीत अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे जि.प.समोर धरणे आंदोलन
हिंगोली प्रतिनिधी
16जून2022
येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यावतीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिफारस करण्याच्या मागणीसाठी शासनाच्या विरोधात घोषणा दि.१६ जुन रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्याचे निवेदन जि.प.महिला व बालविकास अधिकारी यांना देण्यात आले.
राज्य शासनस्तरावर अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने राज्य शासनास देण्यात आली. दि.२३ फेब्रुवारी व दि.६ एप्रिल रोजी आझाद मैदान मुंबई येथे कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन व मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री व प्रधान सचिव यांच्याशी चर्चा करुन विविध मागण्याचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी तुमच्या मागण्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत खास गणवेश भत्ता अदा केल्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा, ऑफलाईन मानधन अदा केल्याचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात यावा, अंगणवाडी इमारतीचे थकीत भाडे द्यावे, थकीत प्रवास भत्ता व इंधन बील द्यावे, सीबीई व मोबाईलचा प्रोत्साहन भत्ता अदा केल्याचा प्रकल्प निहाय आढावा घेण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा, वेतनश्रेणी व अन्य लाभ लागु करुन पुर्ण वेळ कर्मचारी घोषित करुन २१ हजार रुपये वेतन लागु करावे, मानधन दरमहा पाच तारखेपर्यंत देण्यात यावे. एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेन्शन लागु करा, थकीत प्रवास व बैठक भत्ता दर महिन्यांच्या मानधनासोबत जोडु द्यावा अशा विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने गुरुवार दि.१६ जुन रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्याचे निवेदन जि.प.महिला व बालविकास अधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक नेताजी धुमाळ, जिल्हाध्यक्षा सिंधु ठाकुर यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनिस यांच्या स्वाक्षर्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा