बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणा-यांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. नर्सी नामदेव
पोलीसांची धडक कार्यवाही
हिंगोली प्रतिनिधी
20जून2022
मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे आदेशाने हिंगोली जिल्हयात अवैध्द धंद्यांविरुध्द व बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणा-यांविरूध्द कार्यवाहीची “विशेष मोहिम राबवीण्यात येत असुन,
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पो.स्टे. हिंगोली ग्रामीण हद्दीतील मौजे माळहिवरा येथील सोपिनाथ श्रीराम गायकवाड यास बेकायदेशीररीत्या शस्त्र (तलवार) बाळगतांना मिळुन आल्याने त्यास शस्त्रासह ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द पो.स्टे. हिंगोली ग्रामीण येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे. पो. नि. श्री उदय खंडेराय, सपोनि. श्री राजेश मलपिलु, पोह शंकर जाधव, पोह शेख शकील, चापोना प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.
तसेच दुस-या कार्यवाहीत दिनांक- १९/०६/२०२२ पो.स्टे. नर्सी नामदेव येथे मिळालेल्या गोपनिय माहितीवरून हद्दीतील मौजे केसापुर येथे राहणारा नामे नामदेव दादाराव पवार हा बेकायदेशीररीत्या स्वतःचे ताब्यात शस्त्र (रामपुरी चाकु) बाळगतांना मिळुन आल्याने त्यास शस्त्रासह ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द पो.स्टे. नर्सी नामदेव येथे शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. श्री अरूण नागरे, पोना कचुरे, मपोशि घुगे यांनी कारवाईत सहभाग नोंदविला होता
टिप्पणी पोस्ट करा