क्षयरोग म्हणजे काय रुग्णाने कशी काळजी घ्यायची डॉक्टर निरगुडे जिल्हा क्षयरोग अधिकारी

क्षयरोग म्हणजे काय  
डॉक्टर गणपत निरगुडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांची माहिती 
क्षयरोगहामायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या रोगजंतुमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला क्षयरोगहोऊशकतो. ह्या जंतुमुळे फुफ्फुसाला बाधा झाल्यास त्याला फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणतात. फुफ्फुसाचा क्षयरोग हा सर्वात जास्त आढळणारा क्षयरोग आहे. फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर करेणत्याही अवयवाचा ( उदा. हाडे, सांधे, मज्जातंतु इ.) क्षयरोग असल्यास त्याला | फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग (एक्ट्रापल्मन) क्षयरोग म्हणावे.

भारतातील क्षयरोगाचे परिणाम
आपल्या भारत देशात दररोज
४०,००० हुन अधिक लोकांना क्षयरोगाच्या जंतुचा संसर्ग होतो. ५००० हुन अधिक रुग्ण क्षयरोगाने मरण पाववात. म्हणजे दर ३ मिनिटाला २ रुग्ण क्षयरोगाने मरण पावतात.

त्याचप्रमाणे आपल्या देशात दरवर्षी १८ लाखाहुन अधिक नवीन क्षयरूग्ण आढळून येतात. त्यातील ८ लाख रूग्ण थुकी दुषीत (स्पुटम पॉझीटिव्ह) असून ते क्षयरोग पसरवतात.

● पालकाला क्षयरोग झाल्याचे निमीत्त होऊन ३ लाख मुलांना शालेय शिक्षण सोडावे लागते.

● क्षयरोग प्रामुख्याने कमावत्या (१५ ते ५५ वर्षे) वयोगटातील व्यक्तींना होत असल्यामुळे कुटुंबाची व देशाची आर्थिक हानी होते.

● वर्षभरात एक लाख लोकसंखेमध्ये सुमारे २०० क्षयरूग्ण आढळुन येतात.

क्षयरोगावरील उपाय

● क्षयरोग असल्याची खात्री दोन बेडके नमुने तपासून घ्या. रोगाची खात्री झाल्यावर नजीकच्या सरकारी दवाखान्यातुन दैनंदिन उपचार पद्धती प्रत्यक्ष निरीक्षणाखाली मोफत मिळवा.

उपचार पूर्ण कालावधीसाठी व नियमितपणे घ्या.क्षयरोगोचे जंतु मुख्यतः हवेतुन पसरतात. फुफ्फुसाचा क्षयरोग रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा क्षयरोगाचे हे जंतु सुक्ष थेंबाद्वारे हवेत पसरतात. ज्यावेळी जवळचा निरोगी मनुष्य श्वास घेतो तेव्हा ते जंतु त्याच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी मनुष्याला क्षयजंतुचा संसर्ग होतो. मात्र संसर्ग झालेल्या सर्वच व्यक्तींना क्षयरोग होतं नाही. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातहेजंतुवर्षानुवर्षे सुप्त अवस्थेत असतात. अशा संसर्गित माणसाला क्षयरोग होण्याची आयुष्यभरातील शक्यता १० टक्के असते.

फुफ्फुसाच्या क्षयरोगाची लक्षणे

• बेडकायुक्त खोकला - दोन आठवडे किंवा जास्त दिवस

• हलकाचा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

वजन घटने भूक मंदावणे छातीत दुखणे रात्री खुप घाम येणे काही गंभीर क्षयरूग्णांच्या बेडक्यातुन रक्त पडते.

दोन आठवड्यापेक्षा अधिका काळ खोकला असणाऱ्या रुग्णास थुकी तपासणीसाठी पाठवावे.

क्षयरूग्णाचे घ्यावयाची काळजी
हे करा
क्षयरोग असल्यास दैनंदिन उपचार पद्धतीने औषधोपचार घ्या.
क्षयरोगावर उपचार पूर्णपणे शक्य आहे मात्र औषधे पुर्ण कालावधीसाठी नियमीत घ्या.
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नका.

● औषधे मध्येच बंद केल्यास क्षयरोग पुन्हा वाढतो व मुळची औषधे लागु पडत नाहीत. हे करु नका

● कोठेही व इकडे तिकडे धुंकू नका शिंकतांना अथवा खोकतांना तोंडवर रुमाल धरा. क्षयरोग्याला कुटूंबापासुन दुरू ठेऊ नका. अशी माहिती डॉक्टर गणपत निरगुडे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी दिली 
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने