शेतकर्‍यांचे शेतमाल व विद्युत मोटार चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद५ आरोपींना अटक; २६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



शेतकर्‍यांचे शेतमाल व विद्युत मोटार चोरी करणार्‍या टोळीला जेरबंद
५ आरोपींना अटक; २६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली प्रतिनिधी
18जून2022
जिल्हयातील गोरेगाव, सेनगाव, नर्सी नामदेव पोलिस स्टेशन अंतर्गत शेतकर्‍यांचे शेतमाल व शेतातील विद्युत मोटारी चोरी करणार्‍या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व गोरेगाव पोलिसांच्या पथकांने पकडुन अटक केली. आरोपींकडून २६ लपाख १५ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. 

जिल्हयातील गोरेगाव, सेनगाव, नर्सी नामदेव पोलिस स्टेशन हद्दीत शेतकर्‍यांचे शेतमाल व शेतातील विद्युत मोटारी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यावरुन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी गुन्हे करणार्‍या टोळीचा शोध घेण्याचे आदेशीत करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस स्टेशनच्यावतीने गोपनीय बातमीदार व तंत्रशुद्ध तपास पद्धतीने नमुद गुन्हे करणारे टोळीचा शोध सुरु होता. गोरेगाव पोलिस पथक पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना चोरीच्या उद्देशाने मन्नास पिंप्री परिसरात संशयास्पद रित्या आढळुन आले. दिपक विश्‍वनाथ सोमटकर (२०), रा.दोडकी ता.जि.वाशिम, प्रज्वल राजु कव्हर(१९) रा.तामसी ता.जि.वाशिम, अजय गजानन वाकोडकर(१८), रा.गिर्‍हा ता.जि.वाशिम, मुकूंद अशोक श्रीमेवार(२०) रा.दत्तनगर अकोला नाका वाशिम, स्वामी विश्‍वनाथ साबळे(१८) रा.तामसी ता.जि.वाशिम हे पाच आरोपी सशंयास्पद आढळुन आले.  या सशंयिताना गोरेगाव व स्थानिक गुन्हे शाखा व गोरेगाव पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने विचारपुस केली असता त्यांनी गोरेगाव, सेनगाव, नर्सी नामदेव पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. 
आरोपीकडुन तपासा दरम्यान नमुद गुन्हयातील शेतमाल व मोटार विकुन मिळविलेले रक्कम नगदी १ लाख १५ हजार रु. आणि गुन्हयात वापरलेली १ इरटींगा वाहन किंमत १० लाख व २ स्वीफ्ट डिझायर वाहन किंमत १५ लाख रु. असा एकुण २६ लाख १५ हजार रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपींना अटक करण्यात आले असुन त्यांचेकडे अधिक पोलीस तपास सुरू आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.उदय खंडेराय, पो.स्टे. गोरगाव चे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीदेवी पाटील, स्थागुशा स.पो.नि. राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार पोहवा. राहुल गोटरे, सुनिल अंभोरे, पोना. राहुल मैयंदकर, काशिनाथ शिंदे, राजु ठाकुर, नितीन गोरे, पोशि. ज्ञानेश्वर सावळे, तुषार ठाकरे, मपोशि रविना घुमनर सर्व अंमलदार पोलीस स्टेशन गोरेगाव व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने