मोटार सायकल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
हिंगोली प्रतिनिधी
18 जुन 2022
शहरात व परिसरात मागील काही दिवसापासुन मोटार सायकल चोरीच्या घटना मोठया प्रमाणात घडल्या आहेत. यावरुन हिंगोली शहर पोलिसांच्यावतीने सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी सचिन लोणकर रा.राहोली बु. यासह त्याचे दोन साक्षीदार निखील मुदीराज रा.आरामशीन रोड हिंगोली व दशरथ जावळे या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्याचाकडून शहर पोलिसांनी ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात व परीसरात मागील काही दिवसामध्ये मोटार सायकल चोरी घटना घडत असल्याने मोटार सायकल चोरी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हिंगोली शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना दिल्या होत्या त्यानुसार पो.स्टे. हिंगोली शहर येथील पोलीस पथकाने गोपनिय माहीतीगार व तंत्रशुध्द तपास पध्दतीचा वापर करून दि.१७ जुन रोजी नांदेड नाका परीसरात संशयीत आरोपी सचिन रतन लोणकर (वय २०) रा.राहोली बु ता.जि. हिंगोली यास ताब्यात घेवून तपास करता आरोपीने त्याचे ईतर दोन साथीदार निखील मुदीराज रा. आरामशीन रोड हिंगोली व दशरथ मुर्कींदा जावळे रा. राहाली बु. यांचे यांचेसह मिळुन पोलीस स्टेशन हिंगोली शहर हददीत खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली. ज्यात हिंगोली शहर पोलिस स्टेशन दाखल तीन गुन्हयातील आरोपीस अटक करून त्याचे ताव्यातुन तपासात वरील गुन्हयातील चोरीस गेलेले ३ मो.सा एकुण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असुन त्यांचेकडुन अजुन चोरीचे मोटार सायकली मिळुन येण्याची शक्यता आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.पंडीत कच्छवे, शेषराव पोले, मुजीब पठाण, प्रदीप राठोड, सुनिल जैरवाल, गणेश लकुळे, जाधव, साळवे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा