अखेर तिसर्या दिवशी लेखी आश्वासनानंतर हळद वाडी येथील उपोषण सुटले
महाराष्ट्र 24 न्यूज
दि. 03/06/2022
उपरोक्त विषयों मोजे हळदवाडी (नर्सी ना. अंतर्गत) ता. जि. हिंगोली गावास रस्ता उपलब्ध करून न दिल्यास मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. 01/06/2022 रोजी पासुन बेमुदत उपोषणास बसत असल्या बाबत या कार्यालयास सदर्भीय निवेदन क्र. अन्वये कळविण्यात आले आहे. त्यानुसार मोजे हळदवाडी येथील 25 ते 30 ग्रामस्थ दि. 01/06/2022 रोजी पासुन उपोषणास बसले असुन आज उपोषणाचा तिसरा दिवस होता
करीता सदर प्रकरणात संदर्भीय क्र.3 अन्वये कार्यकारी अभियंता बांधकाम जि.प. हिंगोली, तहसिलदार हिंगोली यांच्या सोबत समक्ष चर्चा करण्यात आली असुन सदर चर्चेत कार्यकारी अभियंता बांधकाम जि.प हिंगोली यांनी शासनाच्या रस्ते विकास आराखडा 2001-2021 मध्ये हळदवाडी गावला जोडणारा जो ग्रामीण मार्ग क्र. 50 दर्शविण्यात आला आहे. त्या रस्त्यावर खोल पांदन व नाला असल्यामुळे या भागामध्ये रस्ता करणे शक्य नाही. त्या ऐवजी केसापुर हळदवाडी वैजापुर या ग्रामीण मार्ग क्र.49 च्या रस्त्यावरुन हळदवाडी ते वैजापुर मार्गे असा रस्ता उपलब्ध करून देता येऊ शकतो. असे सुचीत केले आहे तसेच सदर रस्त्याचा समावेश मातोश्री पांदन रस्त्यामध्ये करून रस्त्याचे काम करता येईल असे सदर चर्चेत सुचविले होते परंतु त्यास ग्रामस्थानी विरोध दर्शविल्यामुळे नर्सीीं ते वैजापुर जोडणा-या रस्त्यामार्गे रस्त्याचे काम करुन दयावे अशी मागणी केली सदर रस्त्याचे काम जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्ष 3054 2259) ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण कार्यक्रमाअंतर्गत मा. पालकमंत्री यांच्या परवानगीने करता येईल परंतु यासाठी अवधी लागणार आहे. असे चर्चेत सांगितले असता त्यावर ग्रामस्थ व प्रतिनिधी यांनी सहमती दर्शविली आहे.
त्यामुळे सहास्थितीत हळदवाडी गावाकडे जाण्यासाठी अतिक्रमणामुळे अवघड होत आहे. ते अतिक्रमण तहसिलदार हिंगोली यांनी तात्काळ मार्ग काढून नर्सी ते वैजापुर रस्ता तात्पुरता खुला करून दयावा अशा सुचना दिल्या असल्यामुळे आपले या कार्यालया समोरील चालु असलेले उपोषण मागे घेवून प्रशासनास सहकार्य करावे, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून मागे घेण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा