हिंगोलीत प्रभारी गृहपोलिस उपाधिक्षकासह ६ जणांवर गुन्हा दाखल...!



हिंगोलीत  प्रभारी गृहपोलिस उपाधिक्षकासह ६ जणांवर गुन्हा दाखल...!   

हिंगोली  प्रतिनिधी 
2जुलै2022
शहरातील मस्तानशहा नगर भागात एका तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रभारी गृह पोलिस उपाधीक्षक वसीम हाशमी याच्यासह अन्य पाच महिलांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मस्तानशहा नगरातील विलायत पठाण यांना अनैतिक संबंधाबाबत बोलल्यामुळे वसीम हाशमी याच्यासह पाच महिलांनी त्यांना शिवीगाळ केली होती. या शिवाय त्यांच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर दि. ३० जून रोजी पुन्हा वाद झाला होता. त्यावेळी वसीम हाशमी याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याने विलायत पठाण यांनी एक धार्मिक स्थळामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोषीवर गुन्हे दाखल करावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भुमीका मयत विलायत पठाण यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शुक्रवार दि १ जुलै रोजी पोलिस अधिक्षक कार्यालया समोर ठाण मांडले होते. या प्रकरणात शुक्रवारी रात्री उशीर चर्चा सुरु होती. मात्र जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भुमीका मृत विलायत पठाण यांच्या नातेवाईकांनी घेतल्यानंतर पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात रिझवाना विलायत पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात प्रभारी गृह पोलिस उपाधिक्षक वसीम हाशमी यांच्यासह पाच महिलांवर अश्लिल शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आज पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक काचमांडे, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने